Ladki Bahin Yojana Installment New Date: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्माननिधी जमा करण्यात आला आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जाहीर होणार आहे? याबाबत पात्र महिलांना उत्सुकता लागली आहे. या योजनेचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा!
Table of Contents
फेब्रुवारी व मार्च महिन्याचे ₹3000 खात्यात जमा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्माननिधी जमा करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन टप्प्यात पैसे जमा होत आहे. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत आहे. पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
- दिनांक ७ मार्च २०२५ पासून लाभ वितरण सुरू करण्यात आले होते.
- फेब्रुवारी – ₹1500 + मार्च – ₹1500 = एकूण ₹3000 थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा स्टेटस कसा पाहाल? ऑनलाईन नाही, तर ऑफलाईन सोप्पा मार्ग!
Ladki Bahin Yojana Installment New Date
- Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra: एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा करण्याबाबत अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. (एप्रिल महिन्याच्या सन्मान निधीसाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.)
Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra
साधारणपणे एप्रिल महिन्याचे शेवटी किंवा मे २०२५ मध्ये एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजना हप्ता मिळू शकतो. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
🔹 सरकारने निधी वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली असून सर्व पात्र लाभार्थींना वेळेवर लाभ मिळेल. लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहन्याचे आवाहन करण्यात आले होते.
HSRP नंबर प्लेट नोंदणी, स्टेट्स चेक करा- संपूर्ण माहिती येथे पाहा
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ‘रूपे कार्ड’ लाँच! Ladki Bahin Yojana Rupay Card
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने खास ‘रूपे कार्ड’ लाँच केले आहे. हे कार्ड छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह सुसज्ज असून, डिजिटल पेमेंट, विमा संरक्षण, मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट आणि QR कोडद्वारे पेमेंटसह अनेक सुविधा देणार आहे.

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, जे अशा प्रकारचे विशेष कार्ड (Ladki Bahin Yojana Rupay Card) देत आहे. या कार्डामुळे महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा लाभ मिळणार आहे. अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा!
‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल! ‘या’ महिलांना लाभ मिळणार नाही
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांना इतर सरकारी योजनांमधून दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक मदत मिळते, त्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.
🔹 संजय गांधी निराधार योजनेच्या 2.30 लाख लाभार्थी महिलांना अपात्र घोषित
🔹 कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास लाभ नाकारला जाणार
🔹 नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा स्वतःहून अर्ज मागे घेतलेल्या 1.60 लाख महिलांना योजनेतून वगळले
🔹 वय 65 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या 1.10 लाख महिलांना अपात्र ठरवले
🔹 आंतरराज्य विवाह केलेल्या, आधार कार्ड व बँक खात्यातील नाव वेगळे असलेल्या किंवा दोन अर्ज केलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना यादी कशी व कोठे पहावी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्ही खालील पद्धतींचा अवलंब करू शकता:
ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट:
- लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- वेबसाईटवर “निवडलेल्या अर्जदारांची यादी” या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला मंजूर लाभार्थ्यांची यादी दिसेल.
- नारीशक्ती दूत ॲप:
- जर तुम्ही नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केला असेल, तर ॲप उघडा आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
- होमपेजवर “केलेले अर्ज” या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारने केला मोठा खुलासा! 2.52 कोटी महिलांना मिळणार आर्थिक मदत!
ऑफलाईन
- ग्रामपंचायत/सेतू सुविधा केंद्र:
- तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट द्या.
- अधिकाऱ्यांना तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक सांगा.
- ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील तुमची स्थिती सांगू शकतील.
महत्वाच्या गोष्टी:
- तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमची पात्रता तपासू शकता आणि योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.
- योजनेच्या अद्ययावत माहितीसाठी, अधिकृत वेबसाईटला नियमितपणे भेट देत राहा.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!
निष्कर्ष
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेत सुधारणांसह निधी वितरण सुरू झाले आहे. Ladki Bahin Yojana Installment New Date पात्र महिलांना 7 ते 12 मार्च दरम्यान ₹3000 मिळतील. ‘रूपे कार्ड’ आणि ऑनलाइन यादी तपासणी सुविधांमुळे योजना अधिक सुलभ झाली आहे. अपात्रतेच्या निकषांमुळे पारदर्शकता वाढली असून, अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचेल. योजनेतील नवीन बदल, लाभार्थी यादी आणि अर्ज स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.