Maharashtra Rains Alert: मुंबईत गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली असून, आता हवामान खात्याने पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील जिल्हा निहाय पाऊसाचा अंदाज पाहूया.
दिनांक 15 जून रोजी दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकणात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस (rain) किंवा मेघगर्जनेसह #पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोंकण आणि मराठवाड्यात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवसांचा पाऊसाचा अंदाज | Maharashtra Rains Alert
दिनांक १४ जून २०२४ रोजीचे हवामान अंदाज
दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी व उत्तर कोंकणात अनेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा – सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी असणार आहे.
विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना, मुसळधार पाऊस आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा – रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी
आशा सेविका आणि आरोग्य सेविकांचे बेमुदत काम बंद आंदोलन: काय आहेत मागण्या?
पीएम PM किसान लाभार्थी यादीत नाव येथे चेक करा – डायरेक्ट लिंक
दिनांक १५ जून २०२४ रोजीचे हवामान अंदाज | Maharashtra Rains Alert
दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी व उत्तर कोंकणात अनेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा – रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज
- शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि मेघगर्जनेसह सरी/मध्यम ते मुसळधारपाऊस पडण्याची शक्यता आहे.
- कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०°C आणि २६°C च्या आसपास असेल.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी: https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf
लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, सविस्तर तपशील जाणून घ्या