NMMS Result 2025: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) इयत्ता ८ वी साठीची निवडयादी आज, मंगळवार, दिनांक ०१ एप्रिल, २०२५ रोजी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE Pune) ही यादी https //www.mscepune.in/ nmms result त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या NMMS Scholarship परीक्षेची निवड यादी ची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत होते. २२ डिसेंबर, २०२४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी ७ फेब्रुवारी, २०२५ रोजी जाहीर करण्यात आली होती. तसेच, आवश्यक दुरुस्त्यांसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
Table of Contents
NMMS शिष्यवृत्ती योजना काय आहे?
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस (आता शिक्षण मंत्रालय) द्वारे चालवली जाते. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पण हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १०००/- शिष्यवृत्ती मिळते.
किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती?
यावर्षीच्या NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्रातून २४८७५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी एकूण ११६८२ शिष्यवृत्ती निश्चित केल्या आहेत. राज्याच्या आरक्षण नियमांनुसार आणि प्रत्येक जिल्ह्याच्या इयत्ता ७ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ही निवड करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी ४% आरक्षण देखील आहे.
निवडयादी कुठे पाहाल? NMMS Result 2025
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी आणि गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे:
विद्यार्थी, पालक आणि शाळांनी या संकेतस्थळांना भेट देऊन निकाल आणि निवडयादी पाहू शकतात.
NMMS 2024-25 गुणयादी जाहीर – येथे पहा!
महत्त्वाची सूचना
- निकाल आणि निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध असेल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमातून तो उपलब्ध होणार नाही.
- जिल्हा, शाळा आणि विद्यार्थ्यांनी निकाल परिषदेच्या वेबसाइटवरूनच डाऊनलोड करून घ्यावा.

शिष्यवृत्तीचे वितरण
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाईल.
NMMS शिष्यवृत्ती निवडयादी जाहीर झाल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन!