Pm Kisan Beneficiary List : किसान सन्मान निधी योजनेचा (PM KSNY) 17 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
किसान सन्मान निधी योजना (PM KSNY) केंद्र सरकार द्वारे फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली आहे, या योजनेचा लाभ देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना प्रतिवर्ष रु 6000 ची आर्थिक मदत दिली जात आहे. जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर नुकताच नवीन स्थापन झालेल्या मोदी सरकारने पहिला निर्णय हा किसान सन्मान निधी संदर्भात घेतला आहे.
नवीन सरकारच्या पहिल्याच दिवशीचा पहिला निर्णय हा शेतकरी हितासाठी, किसान सन्मान निधीचा 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, या फाईलवर पहिली सही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या निर्णयाचा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
पीएम PM किसान लाभार्थी यादीत नाव येथे चेक करा – डायरेक्ट लिंक
पीएम PM किसान योजनेचे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही याची स्थिती (Beneficiary Status) तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे नाव या यादीमध्ये दिसेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे कळू शकेल.
- यादीत नाव चेक करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत लिंक https://pmkisan.gov.in/ वर जा.
- तिथे होम पेजवर तुम्हाला Beneficiary List लाभार्थी यादीचा पर्याय मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
- आता तुम्हाला खाली Get Report चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या तुमच्या संपूर्ण गावाची लाभार्थी यादी तुमच्यासमोर दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहज शोधू शकता आणि तुमचे नाव या यादीत समाविष्ट आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
पीएम PM किसान लाभार्थी यादीत नाव येथे चेक करा – डायरेक्ट लिंक
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप हंगामासाठी 1 रुपयात पीक विमा, येथे भरा डायरेक्ट लिंक
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 17 वा हप्ता थेट तुमच्या खात्यात!