महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी, सामान्य प्रशासन विभागाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कार्यालयांसाठी सन २०२५ मधील दोन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली होती.
- ०८ ऑगस्ट रोजी “नारळी पौर्णिमा”.
- ०२ सप्टेंबर रोजी “ज्येष्ठगौरी विसर्जन”.
आता ०६ डिसेंबर रोजी घोषित झालेली सुट्टी ही याच मालिकेतील आहे.
Mahaparinirvan Din Holiday Circular सुट्टीचा तपशील
- दिवस: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन.
- दिनांक: ०६ डिसेंबर, २०२५.
- वार: शनिवार.
- भारतीय सौर दिनांक: १५ मार्गशीर्ष, शके १९४७.
या परिपत्रकानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना ही स्थानिक सुट्टी (Local Holiday) लागू असणार आहे. या Mahaparinirvan Din Holiday Circular मुळे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी झाली आहे.
हा Mahaparinirvan Din Holiday Circular शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/ /बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात आला आहे.
जनतेला या सुट्टीची माहिती होण्यासाठी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला आवश्यक ते प्रसिध्दीपत्रक निर्गमित करण्याची, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी Mahaparinirvan Din Holiday Circular पाहा




