Ladki Bahin Yojana: जर तुम्ही ‘लाडकी बहीण योजने’चे लाभार्थी असाल आणि खात्यात पैसे कधी जमा होणार याची वाट पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या लेखातून तुम्हाला स्पष्ट होईल की निवडणूक आयोगाने नक्की काय आदेश दिला आहे आणि मकरसंक्रांतीला तुम्हाला पैसे मिळणार की नाही.
मकरसंक्रांतीला पैसे जमा होणार?
महाराष्ट्रामध्ये सध्या (Ladki Bahin Yojana) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेने राज्यातील कोट्यवधी महिलांना आर्थिक आधार दिला आहे. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना सरकार दर महिन्याला 1500 रुपयांची मदत करत आहे.
मात्र, अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, तो म्हणजे डिसेंबर महिन्याचा हफ्ता अजून का जमा झाला नाही? याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आचार संहिता आहे.
सध्या राज्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुकांमुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नियमानुसार, आचारसंहिता काळात मतदारांवर प्रभाव पडेल असा कोणताही मोठा निर्णय सरकारला घेता येत नाही. त्यामुळेच गेल्या महिन्याचा हफ्ता जमा होण्यास उशीर झाला आहे.
सरकारने यापूर्वी दिवाळी आणि भाऊबीज अशा सणांच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा करण्यात आले होते. त्याच धर्तीवर, येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र देईल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Ladki Bahin Yojana बाबत विरोधकांचा आक्षेप काय?
मकरसंक्रांतीला पैसे मिळण्याच्या या चर्चेवर विरोधी पक्षाने, विशेषतः काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्यात 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. जर मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच 14 तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो, असे काँग्रेसचे म्हणणे होते. यामुळे 1 कोटी महिला मतदार प्रभावित होऊ शकतात, असा दावा करत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार केली होती.
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
काँग्रेसच्या या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आणि मुख्य सचिवांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आयोगाने मकरसंक्रांतीला पैसे वाटपाच्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, (Ladki Bahin Yojana) अंतर्गत ‘अग्रिम‘ म्हणजेच ॲडव्हान्स स्वरूपात लाभाचे वाटप करण्यास मनाई आहे.
याचा अर्थ असा की, जानेवारी महिना अजून पूर्ण झालेला नाही, त्यामुळे जानेवारीचे पैसे आत्ताच ॲडव्हान्समध्ये देता येणार नाहीत.
निवडणूक आयोगाने जानेवारीचा हफ्ता देण्यास तूर्तास मनाई केली आहे. यामुळे मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता टाळली जाईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.
मग प्रलंबित हफ्त्याचे काय होणार?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग डिसेंबरच्या किंवा आधीच्या थकीत पैशांचे काय? तर इथे महिलांसाठी एक दिलासादायक बाब आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नियमित किंवा प्रलंबित हफ्ता देण्यास हरकत नाही.
म्हणजेच, जर तुमचे डिसेंबर महिन्याचे पैसे यायचे बाकी असतील, तर ते सरकार जमा करू शकते. मात्र, जानेवारीचे पैसे जे ॲडव्हान्स मध्ये देण्याची चर्चा होती, ते आता मिळणार नाहीत. ते पैसे नियमानुसार महिना पूर्ण झाल्यावरच मिळण्याची शक्यता आहे.
थोडक्यात सांगायचे तर, मकरसंक्रांतीला दुप्पट पैसे मिळण्याची जी चर्चा होती, ती आता निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे शक्य होणार नाही. पण तुमचे हक्काचे प्रलंबित पैसे तुम्हाला मिळू शकतात. निवडणूक काळात पारदर्शकता राहावी म्हणून आयोगाने हे पाऊल उचलले आहे.
अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/








