आरटीई 25 टक्के प्रवेश शाळा नोंदणीची तारीख वाढली; पालकांसाठी अर्जाची तारीख कधी? (पहा वेळापत्रक)

Published On: January 23, 2026
Follow Us
RTE Admission School Registration maharashtra date

RTE Admission: महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खाजगी शाळांमधील २५ टक्के (RTE 25% Admission) राखीव जागांवर राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील ‘शाळा नोंदणी’ (School Registration) या टप्प्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रिया का लांबणीवर पडली आणि याची नवीन तारीख काय आहे, तसेच आरटीई साठी फॉर्म कधीपासून भरता येईल? याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया. 

RTE 25% Admission शाळा नोंदणीसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

राज्यातील खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. या जागांवर प्रवेश देण्यासाठी दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. 

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (RTE Admission 2026) ची पूर्वतयारी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ९ ते १९ जानेवारी दरम्यान शाळांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, अनेक शाळांनी या विहित मुदतीत नोंदणी पूर्ण न केल्याने आता या प्रक्रियेला २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळांची नोंदणी बाकी आहे, त्यांना आता आरटीईच्या https://student.maharashtra.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी पूर्ण करता येणार आहे.

आरटीई 25% प्रवेश पात्र शाळा यादी 2026 चेक करा

प्राथमिक शिक्षण संचालक यांनी यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी आणि पडताळणीचे काम दिलेल्या मुदतीत १०० टक्के पूर्ण झाले नाही, ही प्रशासकीय दृष्ट्या गंभीर बाब आहे. त्यामुळे कोणतीही शाळा या प्रक्रियेतून सुटू नये आणि (RTE Admission 2026) प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी २० ते २७ जानेवारीपर्यंत ही वाढीव मुदत देण्यात आली आहे.

या कालावधीत शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी आपल्या अखत्यारीतील सर्व पात्र शाळांची नोंदणी आणि पडताळणी पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीई फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? पालकांनो ही यादी आताच तपासा!

आरटीई साठी फॉर्म कधीपासून भरता येईल?

पालकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही फक्त ‘शाळा नोंदणी’साठी आहे. अजूनही पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. एकदा शाळांची नोंदणी आणि पडताळणी पूर्ण झाली की, त्यानंतरच विद्यार्थ्यांच्या अर्जासाठी वेळापत्रक जाहीर केले जाईल.

त्यामुळे (RTE Admission 2026) साठी इच्छुक असलेल्या पालकांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावी आणि अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवावे. शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होताच, पुढील टप्प्यात पालकांना आपल्या पाल्यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येतील.

राज्य सरकारने फी प्रतिपूर्तीची हमी देत आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत शिक्षणाचे द्वार खुले केले आहे. आता शाळांनी वेळेत नोंदणी केल्यास, विद्यार्थी प्रवेशाची पुढील प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होऊ शकेल.

हे ही वाचा: RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

RTE 25% शाळा नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना पीडीएफ डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment