महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना‘ सुरू केली आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी अर्ज केले आहेत, परंतु ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे अनेक महिला चिंतेत होत्या. याच पार्श्वभूमीवर शासनाने (Ladki Bahin Yojana eKYC Update 2026) संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
या आर्टिकलमध्ये आपण योजनेचे नवीन अपडेट्स, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana eKYC संदर्भात महत्वाची सूचना आणि दिलासा
लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र बऱ्याच पात्र लाभार्थी महिलांच्या केवायसी मध्ये चुका झाल्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळाला नाही.
आता यासंदर्भात e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली असल्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभ
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या प्रत्येक महिलेला दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाते. यामुळे महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत मिळत आहे.
लाभार्थी पात्रता : कोणाला मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- लाभार्थी महिला विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता किंवा निराधार असावी. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही याचा लाभ मिळू शकतो.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (नाव अर्जाप्रमाणे असावे).
- अधिवास प्रमाणपत्र (हे उपलब्ध नसल्यास १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र चालू शकते).
विशेष टीप: परराज्यात जन्म झालेल्या महिलेने पतीचे १५ वर्षांपूर्वीचे पुरावे जोडल्यास ते ग्राह्य धरले जातील.
- उत्पन्नाचा दाखला
- पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
- पांढरे रेशनकार्ड असल्यास किंवा रेशनकार्ड नसल्यास २.५० लाखांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
- बँक खाते तपशील (खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे).
- हमीपत्र आणि फोटो.
लाडकी बहीण योजना ई केवायसी शिफारस पत्र | Ladki Bahin Shifaras Patra
तसेच या योजनेच्या अनेक महिलांना विशेषतः ज्यांचे पती किंवा वडील वारले आहेत, त्यांना आधार लिंक नसल्यामुळे किंवा मृत्यूमुळे OTP प्राप्त करण्यात अडचणी येत होत्या.
या समस्येवर तोडगा म्हणून महिला व बाल विकास विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Ladki Bahin Yojana eKYC Update 2026) नुसार, आता अशा पात्र लाभार्थी महिलांना e-KYC मधून काही अटींनुसार सूट किंवा पर्याय देण्यात आला आहे.
- OTP ची अडचण असल्यास: ज्या महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे निधन झाले आहे आणि त्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावर OTP येत नसेल, अशा महिलांनी स्वतःचे e-KYC पूर्ण करावे.
- कागदपत्रांची पूर्तता: अशा महिलांनी आपल्या पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश (जे लागू असेल ते) याची सत्यप्रत आपल्या गावातील किंवा भागातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी सेविकांची भूमिका: अंगणवाडी सेविका या कागदपत्रांची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष खात्री करतील आणि संबंधित महिलेला पती किंवा वडिलांच्या e-KYC पासून सूट मिळावी, अशी शिफारस करतील.
“टीप: ज्या विधवा किंवा परित्यक्ता महिलांच्या पतीचे आधार लिंक नाही, त्यांनी घाबरून जाऊ नका. तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून ‘शिफारस पत्र‘ घेऊन स्वतःची KYC पूर्ण करू शकता.”
शासनाच्या निर्देशानुसार लाडकी बहीण योजना ई केवायसी शिफारस पत्र ही कागदपत्रे जमा करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती, त्यामुळे या प्रक्रियेत आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी (Physical Verification) करण्यावर भर दिला जात आहे.
लाडकी बहीण योजना ई केवायसी शिफारस पत्र येथे डाउनलोड करा
ज्या महिलांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नसेल किंवा ज्यांना e-KYC मध्ये तांत्रिक अडचणी येत असतील, त्यांच्यासाठी हे अपडेट खूप महत्वाचे आहे. चुकीचा पर्याय निवडल्यास किंवा OTP न मिळाल्यास लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपली माहिती आणि कागदपत्रे लवकरात लवकर सत्यापित करून घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: या योजनेबाबत तुम्हाला काहीही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास, आपण महिला व बाल विकास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८१ वर संपर्क साधू शकता. तसेच https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देवू शकता.








