आरटीई 25% प्रवेश पात्र शाळा यादी 2026: जिल्हा, तालुका निहाय लिस्ट मोबाईलवर असे चेक करा

Published On: January 31, 2026
Follow Us
RTE School List Maharashtra 2026-27

RTE School List Maharashtra 2026-27: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. आपल्या पाल्याचा मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वी पालकांना आपल्या परिसरातील पात्र शाळांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा पालक गुगलवर आरटीई 25% प्रवेश शाळा यादी किंवा RTE School List Near Me असे सर्च करतात, परंतु त्यांना अचूक माहिती मिळत नाही. आजच्या या लेखात आपण आपल्या मोबाईलवरून सोप्या पद्धतीने शाळांची यादी कशी पाहायची, आणि राज्यात RTE Admission Vacancy किती आहे? हे जाणून घेणार आहोत.

RTE प्रवेशासाठी शाळांची निवड का महत्त्वाची आहे?

RTE चा फॉर्म भरताना तुमच्या घरापासून १ किमी आणि ३ किमी अंतरावरील शाळांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे, अर्ज भरण्याआधी तुमच्या भागातील कोणत्या शाळा RTE पात्र आहेत आणि तिथे किती जागा रिक्त आहेत, हे पाहणे गरजेचे आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये, म्हणजेच जर तुम्ही RTE School List Pune किंवा RTE School List Mumbai शोधत असाल, तर तिथे स्पर्धेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पालकांनी आधीच यादी तपासून ठेवणे फायद्याचे ठरते.

केवळ पुणे-मुंबईच नाही, तर RTE School List Thane, RTE School List Nashik आणि RTE School List Nagpur साठी सुद्धा पालकांनी खालील स्टेप्स फॉलो करून आपल्या विभागातील शाळांची माहिती घ्यावी.

आरटीई प्रवेश 2026 27 सुरू होण्याची तारीख कधी? जाणून घ्या नवीन अपडेट

RTE Admission Vacancy 2026: राज्याची स्थिती काय आहे?

सन २०२६-२७ या वर्षासाठी प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ८,२३८ शाळा RTE प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र आहेत. या शाळांमध्ये मिळून एकूण १,०८,८६८ रिक्त जागा (Vacancies) उपलब्ध आहेत. सर्वात जास्त रिक्त जागा पुणे आणि ठाणे जिल्ह्यात आहेत.

  • पुणे: सर्वात जास्त शाळा (८७२) आणि विक्रमी रिक्त जागा (१७,२६९) पुण्यात उपलब्ध आहेत.
  • ठाणे: दुसऱ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा असून तिथे १०,३६६ जागा रिक्त आहेत.
  • नागपूर: नागपूरमध्ये ६१९ शाळांमधून ६,७२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.
  • पालघर आणि नाशिक: या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ५,६०० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.
RTE School List  vacancy 2026

District wise RTE School List Vacancy 2026 च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

RTE School List District Wise Maharashtra (2026-27)

माझ्या जवळील आरटीई शाळेची यादी कशी पहायची? (Step-by-Step Guide)

RTE 25% Admission आरक्षण कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी, पालक अर्ज करण्यापूर्वी आपल्या भागातील पात्र शाळांची यादी पाहू शकतात. जेणेकरून फॉर्म भरताना योग्य शाळा निवड करणे सोपे होते. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील शाळांची यादी पाहू शकता.

rte school list maharashtra 2026-27
  • स्टेप १: सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTE 25% Admission Portal ला भेट द्या.
  • स्टेप २: होम पेजवर तुम्हाला ‘List of Schools (Along with approved Fee)’ हा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • स्टेप ३: आता ‘Search School’ या बॉक्समध्ये State या पर्यायात ‘Maharashtra’ निवडलेले असल्याची खात्री करा (किंवा निवडा).
  • स्टेप ४: District (जिल्हा) या पर्यायातून तुमचा जिल्हा निवडा. (खालीलप्रमाणे जिल्ह्यांची यादी उपलब्ध असेल):
    • जिल्ह्यांची यादी (List of Districts): अहिल्या नगर (Ahilya Nagar), अकोला, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
  • स्टेप ५: जिल्हा निवडल्यानंतर शाळा शोधण्यासाठी दोन पर्याय मिळतील: By Block (तालुका) किंवा By Name (शाळेचे नाव).
    • टीप: ‘By Block’ हा पर्याय निवडणे सर्वात सोपे आहे.
  • स्टेप ६: त्यानंतर Block (तालुका) निवडा आणि पुढे RTE Quota हा पर्याय निवडा.
  • स्टेप ७: Academic Year मध्ये ‘2026-27’ हे वर्ष निवडा.
  • स्टेप ८: शेवटी Search बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला खाली ‘List of Schools Under Selected Block’ (निवडलेल्या तालुक्यातील शाळांची यादी) दिसेल.

महत्वाचे: यादीमध्ये शाळेच्या नावावर क्लिक केल्यास तुम्हाला त्या शाळेचे School Details (उदा. शाळेचा पत्ता, उपलब्ध जागा, माध्यम इ.) सविस्तर पाहता येतील.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 1 ली, LKG, SKG आणि प्ले ग्रुप वयोमर्यादा निश्चित

तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, तरीही वरील पद्धतीचा वापर करून तुम्ही RTE School List Near Me म्हणजेच तुमच्या घराच्या जवळील शाळा सहज शोधू शकता. ही यादी पाहिल्यानंतरच आपल्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज भरा, जेणेकरून प्रवेश मिळण्याची शक्यता वाढेल.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment