Budget Session 2025 : लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget Session 2025 : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 सोमवार, 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत विधानभवन, मुंबई येथे पार पडणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025 Date) 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाईल. तेव्हा लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. सविस्तर वाचा

विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

दिनांक 23 फेब्रुवारी रोजी विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

महत्त्वाचे निर्णय Budget Session 2025

  • 8 मार्च (शनिवार) रोजी सार्वजनिक सुटी असली तरी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील.
  • 13 मार्च (बुधवार) रोजी होळी निमित्त विधिमंडळाच्या कामकाजाला सुटी जाहीर करण्यात आली.

सरकारी नोकरी हवीय? बॉम्बे उच्च न्यायालयात भरती, पगार ₹52,400/-! आजच अर्ज करा!

32,438 पदांसाठी मोठी संधी! अर्ज सुरू! संधी गमावू नका!

राज्याच्या आर्थिक विकासाची दिशा ठरणार!

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session 2025) राज्याच्या विकास योजनांवर मोठे निर्णय अपेक्षित आहेत. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, आणि पायाभूत सुविधा यासंदर्भात महत्त्वपूर्ण तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुधारित निकष जाहीर

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरली आहे. सध्या या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी या रकमेचा वाढ करून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!

मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी नाही! त्यामुळे आता पुढील वर्षाचा सन २०२५-२६ चा अर्थसंक्लप १० मार्च ला जाहीर होणार आहे. त्यामुळे आता या Maharashtra Budget 2025 मध्ये निवडणुकीपूर्वी दिलेले लाडकी बहीण योजनेचे वाढीव २१०० रुपये आश्वासन प्रत्यक्षात येणार का? वाढीव रक्कम कधीपासून लागू होईल? महिलांना थकबाकीची रक्कम मिळणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरे लवकरच राज्याच्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर कळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखों महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

महिलांसाठी मोठी संधी! लाडकी बहीण योजनेच्या लाभातून मिळाले 30 लाख रुपये, यांनी केले तुम्हीही करू शकता

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!