प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ई-ऑफिस (E-Office Maharashtra Circular) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, विभागातील सर्व कार्यासनांना आणि क्षेत्रीय कार्यालयांना (राज्यस्तरीय, विभागीय तसेच जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकारी कार्यालये) शासकीय कामकाज यापुढे केवळ ई-टपालावर (E-Receipt) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर अनिवार्य
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये १ एप्रिल २०२३ पासूनच ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना होत्या. तथापि, विभागामध्ये अजूनही ‘फिजिकल (ऑफलाईन)’ टपाल स्वीकारले जात असल्याने ई-ऑफिसचा मूळ हेतू साध्य होत नव्हता. या पार्श्वभूमीवर, १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या सूचना
ई-टपाल अनिवार्य: शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व कार्यासनांत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये (उदा. सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये) शासकीय कामकाज यापुढे केवळ ई-टपालावरच (ई-रिसिप्ट) करणे अनिवार्य असणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांसाठी निर्देश: क्षेत्रीय कार्यालयांनी पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई-ऑफिस (E-Office Maharashtra Circular) माध्यमातून पाठवावे लागेल, जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही.
अपवाद: केवळ जी टपाल (उदा. पुस्तके, वैद्यकीय परतावा देयके प्रस्ताव इ.) ई-ऑफिस माध्यमातून पाठवणे शक्य नाही, तेच टपाल नोंदणी शाखेमार्फत स्वीकारले जाईल. याव्यतिरिक्त इतर कोणतेही फिजिकल (ऑफलाईन) टपाल स्वीकारले जाणार नाही.
नोंदणी शाखेची भूमिका: मा. मंत्री, मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण), प्रधान सचिव आणि विभागातील सर्व उप सचिवांच्या कार्यालयांकडून प्राप्त होणारे फिजिकल टपाल नोंदणी शाखेने स्वीकारून, त्याचे ई-टपाल (ई-रिसिप्ट) बनवून ते कार्यासनांकडे पाठवणे बंधनकारक आहे.
नस्ती/धारिका निर्मिती: विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यासनात कोणतेही फिजिकल टपाल स्वीकारू नये. नोंदणी शाखेमार्फत ई-ऑफिस प्रणालीवर प्राप्त झालेल्या ई-टपालावरच (ई-रिसिप्ट) नवीन ई-धारिका तयार करून सादर करावी लागेल.
डिजिटल स्वाक्षरी: यापुढे सर्व कार्यासनांनी निर्गमित होणारे सर्व प्रकारचे पत्रव्यवहार डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) करूनच ई-ऑफिस (E-Office Maharashtra Circular) प्रणालीच्या माध्यमातून इतर कार्यासन/क्षेत्रीय कार्यालयांना पाठवावेत.
प्रशासकीय सुधारणांची नांदी
उप सचिव समीर सावंत यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, जलद आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. E-Office Maharashtra Circular नुसार, हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर अधिक प्रभावीपणे आणि काटेकोरपणे करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरेल.
या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे, कागदी कामाचा बोजा कमी होऊन, जनतेची कामे वेळेत पूर्ण होण्यास गती मिळेल अशी आशा आहे.
अधिक माहितीसाठी E Office Maharashtra Circular वाचा




