Independence Day Sarpanch Honor List यावर्षी १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला देशभरातील २१० ग्रामपंचायतींचे सरपंच विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या खास पाहुण्यांमध्ये महाराष्ट्रातील १५ सरपंचांचा समावेश आहे. यातील नऊ महिला सरपंच आहेत. केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाने या सर्व सरपंचांना त्यांच्या गावांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामासाठी आमंत्रित केले आहे.
Independence Day Sarpanch Honor List
या सरपंचांनी काय विशेष काम केले?
या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये सरकारी योजना यशस्वीरीत्या राबवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ अशा अनेक योजनांची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली आहे. याशिवाय, त्यांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्वतःच्या अभिनव कल्पना वापरून गावांचा विकास केला आहे.
महाराष्ट्रातील सन्मानित सरपंच:
महाराष्ट्रातून निवड झालेल्या १५ सरपंचांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- श्री. प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, सोलापूर)
- श्रीमती जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, नागपूर)
- श्री. संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, पुणे)
- श्रीमती डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, अकोला)
- श्रीमती नयना अशोक भुसारे (भावसे, ठाणे)
- श्रीमती सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, वाशिम)
- श्रीमती अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, गडचिरोली)
- श्रीमती संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, अहिल्यानगर)
- श्री. चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, गोंदिया)
- श्रीमती रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, भंडारा)
- श्री. सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, रत्नागिरी)
- श्रीमती पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, परभणी)
- श्री. प्रमोद किसन जगदाळे (बिदल, सातारा)
- श्री. शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, अमरावती)
- श्रीमती प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, लातूर)
सन्मान सोहळा आणि नवीन उपक्रम
१४ ऑगस्ट रोजी या सर्व सरपंचांचा दिल्लीत औपचारिक सत्कार केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ‘आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात ‘सभा सार’ नावाचे एक नवीन अॅप लॉन्च केले जाणार आहे. यासोबतच ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा १६ वा अंकही प्रकाशित होईल.