Jay Jay Maharashtra Majha Song MP3 Download जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवसापासून म्हणजेच दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ पासून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे.
Jay Jay Maharashtra Majha हे राज्यगीत सुमारे १०० ते १०५ सेकंदामध्ये (१.४१ मिनिटे) वाजविता / गाता येणार आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे अधिकृत राज्यगीत (Jai Jai Maharashtra Maza mp3 song Download) राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाजवणे व गायन करणे आवश्यक आहे.
जय जय महाराष्ट्र माझा स्वीकृत संपूर्ण राज्यगीत व नियम
- महाराष्ट्रातील नागरिक आणि विशेषतः तरूण वर्गासाठी स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे.
- ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचे गीतकार कविवर्य राजा निळकंठ बढे आणि मूळ संगीतकार श्रीनिवास खळे असून मूळ गीत शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायले आहे.
- महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आलेल्या दोन चरणांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधूत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली भैसने माडे यांनी ते गायले आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून सदर गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात आले आहे. हे राज्यगीत सुमारे १०० ते १०५ सेकंदामध्ये वाजविता / गाता येईल.
‘जय जय महाराष्ट्र माझा राज्यगीत मार्गदर्शक सूचना
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायन / वादन या संदर्भात औचित्याचे पालन करणे आवश्यक ठरते. त्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करण्यात यावे.
- शासनाने राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा कायमच सर्वोच्च राहील.
- १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल.
- शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
- राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले / गायले जाईल.
- राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास/ गाण्यास मुभा राहील.
- राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्यगीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
- राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते, तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना / गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
- वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.
Jay Jay Maharashtra Majha Song MP3 Download
Jay Jay Maharashtra Majha Song Video Download
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या औचित्यावर महाराष्ट्राचे राज्यगीत स्विकृत करणेबाबत.
जय जय महाराष्ट्र राज्यगीत शासन निर्णय
स्वीकृत करण्यात आलेले राज्यागीत – जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
विचाराधीन संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे, वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक ठरते.
स्वीकृत करण्यात आलेले राज्यागीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा – मूळ गीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा – मूळ गीतामध्ये खालील प्रमाणे चार चरणे आहेत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा
निळे निळे आकाश झाकते या पावन देशा
तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ॥ गर्जा..॥१॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ॥ गर्जा.. ॥२॥
गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू
चधळित पाने पिकली करितो दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडी
ठसक्याची लावणीतही ठसकदार गुलछडी
रंगरंगेला रंगेल मोठा करितो रणमौजा ॥ गर्जा..॥३॥
काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला
दारिद्याच्या उन्हात शिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा गर्जा ॥४॥
शाहीर साबळे यांनी गायलेले गीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा – मूळ गीतामध्ये बदल करून शाहीर साबळे यांनी ३ चरणांचे खालीलप्रमाणे गीत गायले आहे. (Jay Jay Maharashtra Majha Song MP3 Download)
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा
निळे निळे आकाश झाकते या पावन देशा
तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी रेवा, वरदा,
कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ॥ गर्जा..॥१॥
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ॥ गर्जा.. ॥२॥
काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला
दारिद्याच्या उन्हात शिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा गर्जा ॥४॥
Jay Jay Maharashtra Majha Song MP3 Download
Jay Jay Maharashtra Majha Song Video Download
अधिक माहितीसाठी : https://www.maharashtra.gov.in/