लाडकी बहीण योजना: ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांच्यासाठी खुशखबर! 393 कोटी मंजूर

Published On: January 21, 2026
Follow Us
Ladki Bahin Yojana December Hafta

Ladki Bahin Yojana December Hafta: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. अनेक भगिनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची वाट पाहत होत्या. आता ही प्रतीक्षा संपली असून, राज्य सरकारने २० जानेवारी २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

या निर्णयानुसार, डिसेंबर महिन्याच्या लाभासाठी ३९३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता बऱ्याच लाभार्थी लाडक्या बहिणी डिसेंबर च्या हप्त्यापासून वंचित होत्या त्यांना आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठी अपडेट: 393.25 कोटींचा निधी मंजूर | Ladki Bahin Yojana December Hafta

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा जी.आर. काढला आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, डिसेंबर २०२५ चा हप्ता (Ladki Bahin Yojana December Hafta) वितरीत करण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयातील महत्त्वाचे आकडे खालीलप्रमाणे आहेत.

  • एकूण मंजूर निधी: ३९३.२५ कोटी रुपये.
  • कोणत्या महिन्यासाठी? : डिसेंबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी.
  • विभाग: हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे सुपूर्द करण्यात आला असून, तिथून तो लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल.

हे पैसे कोणासाठी आहेत?

हा शासन निर्णय ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा’ने काढला असल्याने, यामध्ये एक तांत्रिक बाब समजून घेणे गरजेचे आहे. हा निधी प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे.

याचाच अर्थ, अनुसूचित जाती घटकाअंतर्गत येणाऱ्या पात्र महिलांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाने विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, ज्या प्रयोजनासाठी (म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी) निधी मागितला आहे, त्याचसाठी तो वापरला गेला पाहिजे.

कोणाला पैसे मिळणार नाहीत?

शासनाने निधी मंजूर करताना एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे, ती म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलेने लक्षात घेतली पाहिजे. जर तुम्ही इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत.

“संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही.” 

जर तुमच्या घरात किंवा तुम्हाला संजय गांधी किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत असतील, तर तुम्हाला Ladki Bahin Yojana December Hafta चा लाभ मिळणार नाही. डबल लाभ घेता येऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाला देण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजना: ई-केवायसी करूनही पैसे जमा झाले नाहीत? तुमच्या अर्जात झाल्या आहेत ‘या’ 3 मोठ्या चुका! 

निधी वितरणाची प्रक्रिया कशी असेल?

१. निधी हस्तांतरण: हा ३९३.२५ कोटींचा निधी आता ‘अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली’वरून महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. 

२. काटकसरीने वापर: हा पैसा खर्च करताना काटकसर करावी आणि मंजूर आराखड्यानुसारच खर्च करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ३. रिपोर्टिंग: या निधीचा वापर कसा झाला, याचे ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ (Utilization Certificate) आणि भौतिक उद्दिष्टे साध्य झाल्याचा अहवाल दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

सरकारने निधी मंजूर केल्यामुळे येत्या काही दिवसांत (संभाव्यतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात) पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. हा निधी विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या लेखाशिर्षातून (Budget Head) आला असला तरी, यामुळे राज्यभरातील वितरण प्रक्रियेला गती मिळेल हे नक्की.

महत्वाच्या सूचना

  • तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक (Aadhaar Seeded) असल्याची खात्री करा.
  • जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय पेन्शन योजनेचा लाभ घेत नसाल, तर तुम्हाला या महिन्याचा लाभ नक्की मिळेल.

Ladki Bahin Yojana December Hafta बाबतची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? हे आर्टिकल तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

अधिक माहितीसाठी : शासन आदेश येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment