Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

Published On: March 10, 2025
Follow Us
Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update: महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दिनांक 10 मार्च दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर होणार आहे, Maharashtra Budget 2025 26 मध्ये लाडक्या बहीणींसाठी 2100 रुपयाचा हप्ता जाहीर होणार का? याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना महत्वाची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यापुढेही यशस्वीपणे राबविण्यात येईल आणि पात्र लाभार्थी महिलांना कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता Ladki Bahin Yojana New Update

या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल, असे आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिले आहे.

लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

महिलांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेत मोठी घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Ladki Bahin Yojana Installment Date

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले असून, ही प्रक्रिया दिनांक 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!

Ladki Bahin Yojana February and March Installment Date Maharashtra

Ladki Bahin Yojana Installment Date: ७ मार्च पासून निधी हस्तांतरण सुरू झाली असून, १२ मार्च रोजी सर्व पात्र महिलांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम मिळेल.

लाडक्या बहीणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे १,५०० प्रमाणे ३,००० रुपये थेट खात्यात जमा होणार आहे.

लाडक्या बहिणीसाठी अर्थसंकल्पात ३६ हजार कोटी रूपये नियतव्यय प्रस्तावित सविस्तर वाचा

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. सध्या या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.

🔹 मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही!
🔹 १० मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प जाही होणार आहे.
🔹 या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या वाढीव २१०० रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता होणार का?
🔹 वाढीव रक्कम कधीपासून लागू होईल?

या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होतील. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे! (Ladki Bahin Yojana New Update)

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर २१०० रुपये मिळणार? येथे पाहा अपडेट

पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत! चेक करा यादी

लाडकी बहीण योजनेची यादी येथे पाहा

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आनंदाची बातमी, मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी भरती!

‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारने केला मोठा खुलासा!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment