MH Nursing CET 2025 Notice : एम एच नर्सिंग परीक्षा 7 एप्रिल व 8 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर तीन सत्रांमध्ये पार पडली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व मॉडेल उत्तरतालिका आता 24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025 दरम्यान अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Table of Contents
वेळापत्रक
- प्रश्नपत्रिका व मॉडेल उत्तरतालिका प्रदर्शित: 24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025
- प्रश्नपत्रिका/उत्तरतालिका बाबत हरकती नोंदवण्याची मुदत: 24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025
हरकतीसाठी महत्त्वाची माहिती
जर उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील एखाद्या प्रश्नावर किंवा उत्तरतालिकेतील उत्तरावर हरकत असेल, तर तो उमेदवार आपल्या पर्सनल लॉगिनद्वारे objection tracking पर्याय वापरून हरकत नोंदवू शकतो. यासाठी प्रत्येक हरकतीसाठी ₹1000/- शुल्क लागू आहे, जे फक्त ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे स्वीकारले जाईल.
केवळ सफल पेमेंटसह केलेल्या हरकतीच पुनर्विचारासाठी ग्राह्य धरल्या जातील. ई-मेल, पोस्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेल्या हरकती वैध मानल्या जाणार नाहीत.
- परीक्षार्थी केवळ आपल्या लॉगिनद्वारे हरकती नोंदवू शकतात.
- प्रत्येक हरकतीसाठी ₹1000/- शुल्क लागू आहे, जे ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावयाचे आहे.
- ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी भेट द्या: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य
अधिकृत संकेतस्थळ: cetcell.mahacet.org
