MHT CET PCM Group Result 2025 Declared – Direct Link

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHT CET PCM Group Result 2025 Declared एमएचटी-सीईटी (MHT-CET) २०२५ चा पीसीएम (Physics, Chemistry, Mathematics) गटाचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर आज, १६ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी, लाखो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

MHT CET PCM Group Result 2025 Declared

परीक्षेची सविस्तर माहिती:

एमएचटी-सीईटी (PCM) गटाची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत १५ सत्रांमध्ये घेण्यात आली होती. राज्यातील १९७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,२५,५४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

तांत्रिक अडचणी आणि फेरपरीक्षा:

२७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या परीक्षेच्या सकाळच्या सत्रात, इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत काही तांत्रिक चुका असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाल्या होत्या. या सत्रामध्ये इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांमधून २७,८३७ उमेदवारांनी भाग घेतला होता.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना योग्य संधी मिळावी यासाठी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) या तांत्रिक अडचणींची दखल घेतली. त्यामुळे, २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ मे २०२५ रोजी पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचे हित जपले गेले आणि त्यांना त्यांचे कौशल्य पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळाली.

अखेरीस, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज, १६ जून २०२५ रोजी एमएचटी-सीईटी (PCM) २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन! पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा!

MHT CET PCM Group Result 2025 Declared – Direct Link

MHT CET PCM गट 2025 चा निकाल आज (16 जून 2025) जाहीर झाला आहे. निकाल तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:

MHT CET PCM गट निकाल तपासण्यासाठीच्या पायऱ्या (Steps to check MHT CET PCM Group Result):

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलच्या (State Common Entrance Test Cell, Maharashtra) अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटचा पत्ता आहे: https://cetcell.mahacet.org/ तुम्ही mhtcet.mahacet.org या वेबसाइटवर देखील निकाल पाहू शकता.
  2. निकाल लिंक शोधा: होमपेजवर तुम्हाला “PCM Group – June 16, 2025” हा टॅब दिसेल त्याखाली Access your results यावर क्लिक करा.
  3. लॉगिन क्रेडेन्शियल्स टाका: नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला तुमचा Registered Email ID ईमेल आयडी (Email ID) आणि पासवर्ड (Password) टाकावा लागेल.
  4. निकाल पहा आणि डाउनलोड करा: माहिती टाकून Sign in बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा MHT CET PCM ग्रुपचा निकाल (स्कोअरकार्ड) स्क्रीनवर दिसेल. निकाल काळजीपूर्वक तपासा आणि तो डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. भविष्यातील संदर्भासाठी याची आवश्यकता असेल.

PCM Group – June 16, 2025 Access your results Direct Link Click Here

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!