PM YASASVI Scholarship Scheme: शिक्षण घेत असताना आर्थिक मदत मिळाली तर किती मोठा आधार मिळतो, हे आपण सर्वच जाणतो. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थी इयत्ता ९ वी, १० वी किंवा त्यापुढील शिक्षण घेत असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
‘पीएम- यशस्वी’ PM YASASVI Scholarship Scheme
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ‘पीएम- यशस्वी’ (PM-YASASVI) योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. विशेषतः मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज (VJNT), इमाव (OBC) आणि विमाप्र (SBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
मुदत संपण्याआधी अर्ज करा! इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबईचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा.
या योजनेत (Pre-matric scholarship) आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती अशा दोन टप्प्यांत लाभ दिला जातो. त्याचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे आहेत:
१. प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी व १० वी साठी)
- जर विद्यार्थी ९ वी किंवा १० वी मध्ये शिकत असेल, तर त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
- शिष्यवृत्ती रक्कम: ५,००० रुपये वार्षिक.
- अटी: पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असावे. शाळेत किमान ७५% उपस्थिती आवश्यक आहे.
विशेष टीप: ही (Pre-matric scholarship) कुटुंबातील दोन मुलांनाच मिळते, मात्र मुलींसाठी ही संख्या मर्यादा नाही.
२. पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर/व्यावसायिक शिक्षण)
- पात्रता: ११ वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंतचे विद्यार्थी.
- अटी: वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी आणि ७5% उपस्थिती आवश्यक.
फायदा: शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा (DBT) होईल. मात्र लक्षात ठेवा, अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास रक्कम परत करावी लागेल.
अर्ज कोठे आणि कसा करायचा?
विद्यार्थ्यांनी NSP (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल) म्हणजेच https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
महत्वाची कागदपत्रे जवळ ठेवा: अर्ज भरताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
- जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- आधार लिंक केलेले बँक खाते पासबुक.
- बोनाफाईड प्रमाणपत्र.
- मागील वर्षाचे गुणपत्रक.
ही (Pre-matric scholarship) आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुमच्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन नक्की घ्या. कोणताच पात्र विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी हे आर्टिकल जास्तीत जास्त शेअर करा!
अधिक माहितीसाठी : https://www.myscheme.gov.in/schemes/pm-yasasvitcceobcebcdnts







