RTE Admission Start Date 2026 27: जर तुम्ही आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणासाठी RTE प्रवेशाची वाट पाहत असाल, तर आता शिक्षण विभागाकडून या RTE प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, आरटीई प्रवेश 2026 27 सुरू होण्याची तारीख कधी आहे? आणि पालकांना फॉर्म कधीपासून भरता येणार? याबाबतची लेटेस्ट अपडेट सविस्तर पाहूया.
नवीन अपडेट: आरटीई प्रवेश 2026 27 साठी शाळा नोंदणी सुरू झाली असून, आता ३० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता लवकरच RTE Admission Registration प्रक्रियेला सुरुवात होईल. याबाबतचे अधिकृत अपडेट लवकरच अपडेट केले जाईल.
RTE Admission शाळांची नोंदणी सुरू
महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. यानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
हे नवीन परिपत्रक प्रामुख्याने शाळांच्या नोंदणीबद्दल आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाने दिनांक ०९ जानेवारी २०२६ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळांना नोंदणी (School Registration) करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र आता शाळा दुसऱ्यांदा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई 25% प्रवेश पात्र शाळा यादी 2026: जिल्हा, तालुका निहाय लिस्ट मोबाईलवर असे चेक करा
याचाच अर्थ, सध्या फक्त शाळांनी आपली माहिती ऑनलाईन भरायची आहे. पालकांना अर्ज भरण्यासाठी ही तारीख नाही, त्यामुळे पालकांनी गोंधळून जाऊ नये. शाळांची ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पालकांसाठी अर्जाची लिंक ओपन होणार आहे.
जेव्हा पालक (RTE Admission Start Date 2026 27) बद्दल विचारणा करतात, तेव्हा त्यांना हे समजणे गरजेचे आहे की, जोपर्यंत तुमच्या परिसरातील शाळांची नोंदणी आणि वेरिफिकेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला शाळेचा पर्याय निवडता येणार नाही. म्हणूनच हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 1 ली, LKG, SKG आणि प्ले ग्रुप वयोमर्यादा निश्चित
शासनाने यावर्षी शाळांच्या वेरिफिकेशनवर खूप जोर दिला आहे. या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे.
शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, शाळांचे वेरिफिकेशन करताना विशेष काळजी घ्यावी. ज्या शाळा बंद झाल्या आहेत किंवा ज्या शाळांना अजूनही मान्यता मिळालेली नाही, अशा शाळांना या प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.
तसेच, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आणि स्थलांतरित झालेल्या शाळा आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होणार नाहीत, याची खात्री करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे पालकांची फसवणूक टळेल आणि पाल्याला योग्य शाळेत प्रवेश मिळेल.
बऱ्याचदा शाळेचे माध्यम आणि बोर्ड (State Board vs CBSE/ICSE) याबद्दल गोंधळ होतो. पण यावेळी शासनाने स्पष्ट केले आहे की, शाळेची मान्यता ज्या बोर्डाची आहे, तेच बोर्ड नोंदणी करताना निवडले गेले पाहिजे. उदा. राज्य मंडळाची शाळा असेल तर केंद्रीय मंडळ निवडता कामा नये.
RTE Admission Start Date 2026 27
ही सर्व शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया 30 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच, या तारखेनंतर पालकांसाठी लॉटरीच्या अर्जाचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
पालकांसाठी (RTE Admission Start Date 2026 27) ची अधिकृत तारीख जाहीर होताच, तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल. तोपर्यंत पालकांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत.
शाळांची नोंदणी पूर्ण होताच, तुमच्या विभागातील किती शाळा आणि किती जागा उपलब्ध आहेत, याची यादी पोर्टलवर दिसेल. त्यानंतरच तुम्हाला आपल्या आवडीच्या शाळेचा क्रम लावता येईल.
त्यामुळे, पालकांनी आतापासूनच पाल्याचा जन्म दाखला, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला (लागू असल्यास) काढून ठेवावा. ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून ही तयारी आताच करणे शहाणपणाचे ठरेल.
RTE Admission A to Z संपूर्ण माहिती येथे वाचा
थोडक्यात सांगायचे तर, RTE प्रक्रियेची पहिली घंटा वाजली आहे. आता 30 जानेवारीपर्यंत शाळांची नोंदणी होईल आणि त्यानंतर पालकांसाठी आरटीई प्रवेश 2026 27 सुरू होण्याची तारीख आणि शेवटची तारीख वेळापत्रक जाहीर होईल. (RTE Admission Start Date 2026 27) जवळ येत असल्याने पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नवीन
अधिकृत वेबसाईट : https://student.maharashtra.gov.in/







