11th Admission Round 2 Allotment List Announced महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (इ. ११ वी) प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेता यावा यासाठी mahafyjcadmissions.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. १७ जुलै २०२५ रोजी दुसरी फेरीच्या याद्या घोषित करण्यात आल्या आहे.
11th Admission Round 2 Allotment List Announced
शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. यामध्ये एकूण ९४८३ कनिष्ठ महाविद्यालयांच्या एकूण १९३२४ शाखा प्रकार व अनुदान प्रकार निहाय तुकडया संख्या आहेत. दुसरी फेरी कैंप व कोटा प्रवेशातंर्गत दिनांक १७ जुलै २०२५ रोजी यादया घोषित करण्यात आलेल्या आहेत.
आज दिनांक १७ जुलै २०२५ रोजी खालील प्रमाणे विभागनिहाय व शाखानिहाय विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय अलॉट करण्यात आलेले आहेत त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे:

विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक १८ जुलै २०२५ ते २१ जुलै, २०२५ पर्यंत कालावधी आहे.
Regular Round-2 Download Allotment List
- CAP Allotment List Round-2 Arts
- CAP Allotment List Round-2 Commerce
- CAP Allotment List Round-2 Science
प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्यांनी संबंधित माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टल – https://mahafyicadmissions.in ला भेट द्यावी किंवा support@mahafyicadmissions.in या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०२२०१९५५५४४ वर संपर्क साधता येईल.



