महाराष्ट्र निवडणूक 2026: मतदानासाठी पगारी सुट्टी जाहीर, शासन निर्णय निर्गमित

Published On: February 1, 2026
Follow Us
ZP Election Holiday Notification 2026

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (ZP Election Holiday Notification 2026) नुसार, मतदानाच्या दिवशी संबंधित क्षेत्रातील कामगारांना भरपगारी सुट्टी दिली जाणार आहे.

या आर्टिकलमध्ये आपण महाराष्ट्र निवडणूक सुट्टी शासन निर्णय, नियम आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तपशीलमाहिती
शासन विभागउद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, महाराष्ट्र शासन
शासन निर्णय दिनांक३० जानेवारी २०२६
निवडणुकीची तारीख०७ फेब्रुवारी २०२६
निवडणुकीचे नावजिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६
निवडणूक क्षेत्रराज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्या
सुट्टीचे स्वरूपमतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
विशेष सवलतअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण सुट्टी शक्य नसल्यास २ ते ३ तासांची सवलत
कारवाईचा इशारासुट्टी न दिल्यास किंवा सवलत नाकारल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात येईल
समाविष्ट जिल्हे१. रायगड २. रत्नागिरी ३. सिंधुदुर्ग ४. पुणे ५. सातारा ६. सांगली ७. सोलापूर ८. कोल्हापूर ९. छत्रपती संभाजीनगर १०. परभणी ११. धाराशीव १२. लातूर
अधिकृत संकेतस्थळwww.maharashtra.gov.in (संकेताक: २०२६०१३०१७५५५५०४१०)

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026: मतदानासाठी पगारी सुट्टी जाहीर शासन निर्णय 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. लोकशाहीमध्ये १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अपेक्षित आहे. याच उद्देशाने, लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘इलेक्शन ड्युटी’ भत्त्याच्या दरात मोठी वाढ; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी

कोणाकोणाला मिळणार ‘निवडणूक सुट्टी’?

बऱ्याचदा खाजगी कंपन्या किंवा आस्थापना आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेकजण मतदानापासून वंचित राहतात. हे टाळण्यासाठी शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत. 

दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजीच्या आदेशानुसार ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्या, मॉल, रिटेलर्स, आयटी (IT) कंपन्या, हॉटेल्स, आणि निवासी हॉटेल्स यांना लागू असेल.

जर एखादा कामगार/कर्मचारी निवडणूक होणाऱ्या क्षेत्राचा मतदार असेल, पण तो कामानिमित्त त्या क्षेत्राबाहेर कार्यरत असेल, तरीही त्याला मतदासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

म्हणजेच, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 साठी खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील मतदारांना हा नियम लागू होईल.

अपवादात्मक परिस्थिती आणि सवलत

काही सेवा या अत्यंत अत्यावश्यक किंवा लोकोपयोगी असतात. अशा ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास काय करावे, याचेही स्पष्टीकरण (ZP Election Holiday Notification 2026) मध्ये देण्यात आले आहे.

अपवादात्मक परिस्थितीत, जर पूर्ण दिवस सुट्टी दिल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असेल किंवा ती सेवा धोकादायक ठरणार असेल, तर कर्मचाऱ्यांना २ ते ३ तासांची विशेष सवलत दिली जावी.

मात्र, ही सवलत केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच असून, याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे गरजेचे आहे.

नियम मोडल्यास कडक कारवाई

या मतदान सुट्टी शासन निर्णय परिपत्रकाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना शासनाने सर्व आस्थापनांना दिल्या आहेत. जर कोणत्याही कामगाराने किंवा कर्मचाऱ्याने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न मिळाल्याची तक्रार केली, तर संबंधित कंपनी किंवा आस्थापनेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

निवडणूक होणारे जिल्हे आणि क्षेत्र

जिल्हा परिषद निवडणूक 2026 तारीख ०७ फेब्रुवारी निश्चित झाली असून, खालील १२ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये मतदान पार पडणार आहे:

१. रायगड: (पनवेल, कर्जत, अलिबाग, महाड इ. सह १५ पंचायत समित्या)  २. रत्नागिरी: (दापोली, चिपळूण, रत्नागिरी इ. सह ९ पंचायत समित्या)  ३. सिंधुदुर्ग: (कणकवली, मालवण, सावंतवाडी इ. सह ८ पंचायत समित्या)  ४. पुणे: (जुन्नर, बारामती, हवेली, इंदापूर इ. सह १३ पंचायत समित्या)  ५. सातारा: (फलटण, सातारा, कराड, महाबळेश्वर इ. सह ११ पंचायत समित्या)  ६. सांगली: (मिरज, वाळवा, तासगाव इ. सह १० पंचायत समित्या)  ७. सोलापूर: (पंढरपूर, बार्शी, माढा इ. सह ११ पंचायत समित्या)  ८. कोल्हापूर: (करवीर, हातकणंगले, शाहुवाडी इ. सह १२ पंचायत समित्या)  ९. छत्रपती संभाजीनगर: (सिल्लोड, पैठण, गंगापूर इ. सह ९ पंचायत समित्या)  १०. परभणी: (परभणी, सेलू, गंगाखेड इ. सह ९ पंचायत समित्या)  ११. धाराशीव: (तुळजापूर, उमरगा, कळंब इ. सह ८ पंचायत समित्या)  १२. लातूर: (उदगीर, निलंगा, लातूर, औसा इ. सह १० पंचायत समित्या)

आपल्या लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे (ZP Election Holiday Notification 2026) द्वारे मिळालेल्या या सुट्टीचा उपयोग सुट्टी म्हणून न करता, आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नक्की करा.

अधिक माहितीसाठी : महाराष्ट्र निवडणूक सुट्टी शासन निर्णय डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment