राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत 1974 रिक्त पदांची भरती जाहीर

By MarathiAlert Team

Published on:

महाराष्ट्रातील तरुणांसाठी आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई/महाराष्ट्र अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) या कंत्राटी पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. एकूण १९७४ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भरती तपशील | NHM Recruitment 2025 Maharashtra

  • पदाचे नाव: समुदाय आरोग्य अधिकारी
  • एकूण रिक्त जागा : 1974

रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे

samuday arogya adhikari

शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

या महत्त्वाकांक्षी NHM Recruitment 2025 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे: आयुर्वेद (BAMS) , युनानी (BUMS), बी.एस्सी. नर्सिंग, किंवा बी.एस्सी. इन कम्युनिटी हेल्थ. संबंधित पदवीधारकांकडे इंटर्नशिप पूर्ण केल्याचे आणि NMC/MCIM किंवा नर्सिंग कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

उमेदवारांनी NHM च्या अधिकृत संकेतस्थळावर https://nhm.maharashtra.gov.in जाऊन सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज केवळ ONLINE पद्धतीनेच स्वीकारले जातील. अर्ज आणि परीक्षेच्या तारखा तसेच प्रवेशपत्राबाबतची माहिती याच संकेतस्थळावर ‘नोटिफिकेशन’द्वारे वेळोवेळी उपलब्ध होईल.

परीक्षा स्वरूप

निवड प्रक्रिया ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षेद्वारे होईल. ही परीक्षा १०० गुणांची, १०० प्रश्नांची (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) असेल आणि त्यासाठी १२० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. या परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुण (Negative Marking) पद्धत लागू नाही.

उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. १०००/- असून, मागास प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी रु. ९००/- आहे.
  • माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पगार

प्रशिक्षण दरम्यान: प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६ महिन्यांच्या प्रमाणपत्र प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड (Stipend) दिले जाईल.

नियुक्तीनंतर: आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रावर नियुक्ती झाल्यावर उमेदवारांना दरमहा रु. २५,०००/- वेतन आणि रु. १५,०००/- कामावर आधारित प्रोत्साहन मोबदला (PBI) देय राहील.

राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात काम करणाऱ्यांना रु. १५,०००/- चा अतिरिक्त प्रोत्साहन मोबदला देखील दिला जाईल.

या NHM Recruitment 2025 अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला पुढील ३ वर्षांसाठी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासन सेवा देणे बंधनकारक असेल.

यासाठी प्रशिक्षणाला रुजू होण्यापूर्वी रक्कम रु. १,०३,०००/- चा बाँड (Bond) सादर करणे अनिवार्य आहे.भरती प्रक्रियेतील कोणत्याही बदलांची किंवा नवीन माहितीची नोंद उमेदवारांनी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी घ्यावी. भरती प्रक्रियेशी संबंधित इतर कोणत्याही माध्यमाद्वारे माहिती उपलब्ध होणार नाही, याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी : राष्ट्रीय आरोग्य अभियान सविस्तर पीडीएफ जाहिरात पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!