ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (UMEED) अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानामध्ये गावपातळीवर अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या वेगवेगळ्या संवर्गातील “समुदाय संसाधन व्यक्तीं” (Community Resource Persons) यांना आता ‘ग्रामसखी’ या नावाने संबोधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक १३ डिसेंबर, २०२५ रोजी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी उमेदची स्थापना
सन २०११ पासून केंद्र शासनामार्फ़त ‘दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (DAY-NRLM) राज्यातील ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलनासाठी राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची’ (Maharashtra State Rural Livelihood Mission) म्हणजेच ‘उमेद’ची स्थापना करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि जोखीमप्रवण महिलांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक आणि लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
संघटन आणि शाश्वत उपजीविकेवर भर
उमेद अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते क्लस्टरस्तरापर्यंत एक स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
या माध्यमातून, गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट (Self Help Groups), स्वयं सहाय्यता गटांचे ग्रामसंघ (Village Organisations) आणि ग्रामसंघांचे प्रभागसंघ (Cluster Level Federations) तयार करून गरीब महिलांचे मजबूत संघटन तयार केले जाते.
या संघटित शक्तीच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविका (Sustainable Livelihood) उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. गावपातळीवर सुलभिकरणाचे कार्य करणाऱ्या याच ‘समुदाय संसाधन व्यक्तीं’ना, म्हणजे NRLM Community Resource Person New Designation धारकांना, आता अधिक सन्मानाने ‘ग्रामसखी’ म्हणून ओळखले जाईल.
शासन निर्णयाद्वारे ‘ग्रामसखी’ नामकरण
अभियानांतर्गत कार्यरत ‘समुदाय संसाधन व्यक्तीं‘ (Community Resource Persons) या ग्रामीण महिलांना मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्यांच्या या योगदानाला अधिकृत ओळख देत, महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक १३ डिसेंबर, २०२५ जारी केलेल्या निर्णयानुसार, हा NRLM Community Resource Person New Designation बदल तत्काळ अंमलात येणार आहे.
या निर्णयामुळे ‘ग्रामसखी’ म्हणून या महिलांना समाजात नवीन प्रतिष्ठा आणि ओळख मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा



