महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala (टप्पा-३) अभियानांतर्गत शाळांना माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्त यांनी नुकतेच परिपत्रक निर्गमित केले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 शाळांना माहिती भरण्यासाठी मुदतवाढ
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अभियानासाठी माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू होती. १९ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३८,०२२ शाळांनी माहिती भरण्यास सुरुवात केली आहे, तर त्यापैकी २६,६७६ शाळांनी आपली माहिती अंतिम (Finalize) केली आहे.
मात्र, अद्यापही अनेक शाळांची माहिती भरणे बाकी असल्याचे निदर्शनास आल्याने, शिक्षण आयुक्तालयाने माहिती अंतिम करण्यासाठी २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शाळांनी भरलेल्या माहितीची शहानिशा आणि मूल्यांकन केंद्रस्तरावर केले जाणार आहे. यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) यांच्या लॉगिनला २५ डिसेंबर २०२५ पासून सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे शाळांनी आपली माहिती विहित वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणांकन सुधारित निकषानुसार करण्याचे निर्देश
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala अभियानांतर्गत मूल्यांकनासाठी काही सुधारित सूचनाही देण्यात आल्या आहेत. १५ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार गुणांकनाचे निकष सुधारित करण्यात आले असून, मूल्यमापन समितीने याची दखल घेणे आवश्यक आहे.
१५ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार (जीआर) ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (टप्पा-३) अभियानासाठी गुणांकन पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे बदल आणि नवीन निकष जाहीर करण्यात आले आहेत.
१. लागू असलेल्या निकषांवरच गुणांकन आणि टक्केवारी (Percentage Based Grading):
काही विशिष्ट गुणांकन निकष सर्व प्रकारच्या शाळांना किंवा व्यवस्थापनांना लागू होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे, नवीन निर्णयानुसार, ज्या शाळांना जे निकष लागू होत नाहीत, ते वगळून केवळ लागू होणाऱ्या निकषांच्या गुणांच्या आधारेच गुणांकन केले जाईल.
शाळांनी प्राप्त केलेले हे गुण त्यानंतर टक्केवारीमध्ये रूपांतरित केले जातील आणि त्या टक्केवारीच्या आधारे शाळेचे अंतिम मूल्यांकन केले जाईल.
२. शैक्षणिक संपादणूक (Academic Performance) तपासण्यासाठी बदल:
‘शैक्षणिक संपादणूक (क-१)’ या घटकामध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती ‘PAT’ (Periodic Assessment Test) नुसार तपासली जाते, जी इयत्ता १ ली ते ८ वी साठी लागू आहे.
मात्र, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी आता PAT ऐवजी खालील बाबी तपासल्या जातील:
- CCE (सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन) संपादणूक पातळी.
- इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल.
- इयत्ता ९ वी आणि ११ वीचा सत्र-१ व सत्र-२ चा निकाल आवश्यकतेनुसार ग्राह्य धरला जाईल.
थोडक्यात, सर्व शाळांना एकाच तराजूत न तोलता, त्यांच्या प्रकारानुसार लागू असलेल्या निकषांवरूनच त्यांची टक्केवारी काढून स्पर्धेचा निकाल लावला जाईल, हा यातला मुख्य बदल आहे.
विशेष म्हणजे, शाळांचे मूल्यांकन करताना केंद्र व राज्य शासनाचे विविध उपक्रम, अभियाने आणि योजना शाळेत किती प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, याची अद्ययावत स्थिती विचारात घेतली जाईल.
शाळांसाठी आवाहन राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ज्या शाळांनी अद्याप आपली माहिती अंतिम केलेली नाही, त्यांनी २९ डिसेंबर या अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala या उपक्रमाद्वारे शाळांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा मानस आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 रजिस्ट्रेशन नोंदणी डायरेक्ट लिंक




