Jayanti National Day 2026: येत्या नवीन वर्षाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. अशातच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन २०२६ सालासाठीचे एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये २०२६ या वर्षात साजरे करण्यात येणारे राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि राष्ट्रीय दिनांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांसाठी हे वेळापत्रक बंधनकारक असणार आहे. संपूर्ण यादी सह नियमावली सविस्तर वाचा.
Jayanti National Day 2026 संदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश
राज्य शासनाने २९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या या परिपत्रकानुसार, मंत्रालयापासून ते स्थानिक पातळीवरील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हे दिवस साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, एखादी जयंती किंवा राष्ट्रीय दिन हा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार-रविवारच्या दिवशी येत असेल, तरीही तो कार्यक्रम त्याच दिवशी साजरा करणे अनिवार्य असणार आहे.
केवळ केंद्र शासनाने काही बदल सुचविल्यास त्यात बदल होईल, अन्यथा ठरलेल्या दिवशीच अभिवादन कार्यक्रम पार पडतील.
या Jayanti National Day 2026 च्या यादीमध्ये काही प्रमुख तारखा खालीलप्रमाणे आहेत:
- जानेवारी: वर्षाची सुरुवात ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीने होईल. त्यानंतर १२ जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाईल. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होईल.
- फेब्रुवारी: १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. तसेच २३ फेब्रुवारीला संत गाडगे बाबा जयंती असेल.
- मार्च व एप्रिल: २३ मार्चला ‘शहीद दिन’ पाळला जाईल. एप्रिल महिन्यात ११ तारखेला महात्मा ज्योतिबा फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या सूचना आहेत.
- मे ते डिसेंबर: या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर (२८ मे), राजर्षी शाहू महाराज (२६ जून), लोकमान्य टिळक (२३ जुलै), साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (१ ऑगस्ट) आणि महात्मा गांधी (२ ऑक्टोबर) अशा अनेक थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 2026 वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर
विशेष कार्यक्रमांचे आयोजन
केवळ हार अर्पण करून हे दिवस साजरे करायचे नाहीत, तर काही विशिष्ट दिवशी विशेष उपक्रम राबवण्याचे निर्देशही या Jayanti National Day 2026 च्या परिपत्रकात आहेत:
२१ मे (दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस): या दिवशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथ घ्यावी लागेल.
३१ ऑक्टोबर (राष्ट्रीय एकता दिवस): सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेणे अपेक्षित आहे.
२६ नोव्हेंबर (संविधान दिवस): या दिवशी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सन 2026 मधील जयंती आणि राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी
जानेवारी २०२६
- ३ जानेवारी: सावित्रीबाई फुले जयंती
- १२ जानेवारी: जिजाऊ माँ साहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती
- २३ जानेवारी: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरे जयंती
फेब्रुवारी २०२६
- १ फेब्रुवारी: संत रविदास महाराज जयंती
- १५ फेब्रुवारी: संत सेवालाल महाराज जयंती
- १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- २० फेब्रुवारी: बाळशास्त्री जांभेकर जयंती
- २३ फेब्रुवारी: संत गाडगे बाबा जयंती
मार्च २०२६
- १२ मार्च: यशवंतराव चव्हाण जयंती
- २३ मार्च: शहीद दिन (भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन)
एप्रिल २०२६
- ११ एप्रिल: महात्मा ज्योतिबा फुले जयंती
- १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- १९ एप्रिल: महात्मा बसवेश्वर जयंती
- ३० एप्रिल: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती
मे २०२६
- १४ मे: छत्रपती संभाजी महाराज जयंती
- २१ मे: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस
- २८ मे: स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
- ३१ मे: अहिल्यादेवी होळकर जयंती
जून २०२६
- १७ जून: महाराणा प्रतापसिंह जयंती
- २६ जून: राजर्षि शाहू महाराज जयंती
जुलै २०२६
- १ जुलै: वसंतराव नाईक जयंती
- २३ जुलै: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
ऑगस्ट २०२६
- १ ऑगस्ट: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती
- ३ ऑगस्ट: क्रांतिसिंह नाना पाटील जयंती
- २० ऑगस्ट: सद्भावना दिवस
सप्टेंबर २०२६
- ७ सप्टेंबर: राजे उमाजी नाईक जयंती
- १३ सप्टेंबर: भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन
- १७ सप्टेंबर: केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती
- २५ सप्टेंबर: पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती (अंत्योदय दिवस)
ऑक्टोबर २०२६
- २ ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती
- १५ ऑक्टोबर: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती
- २६ ऑक्टोबर: महर्षि वाल्मिकी जयंती
- ३१ ऑक्टोबर: इंदिरा गांधी पुण्यतिथी (राष्ट्रीय संकल्प दिवस) आणि वल्लभभाई पटेल जयंती (राष्ट्रीय एकता दिवस)
नोव्हेंबर २०२६
- १४ नोव्हेंबर: पंडीत नेहरु जयंती
- १५ नोव्हेंबर: बिरसा मुंडा जयंती
- १९ नोव्हेंबर: इंदिरा गांधी जयंती (राष्ट्रीय एकात्मता दिन)
- २६ नोव्हेंबर: संविधान दिवस
डिसेंबर २०२६
- ८ डिसेंबर: संत संताजी जगनाडे महाराज जयंती
- २५ डिसेंबर: अटल बिहारी वाजपेयी जयंती
- २६ डिसेंबर: वीर बाल दिवस
- २७ डिसेंबर: डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती
शासनाने हे परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करून दिले असून, त्याचा संकेतांक २०२५१२२९१६०४५८९१०७ असा आहे. सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


सन 2026 मधील महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिन नियमावली
दि. २९ डिसेंबर २०२५ च्या शासन परिपत्रकानुसार, २०२६ सालासाठी महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतची नियमावली (guidelines) खालीलप्रमाणे आहे.
१. कार्यक्रमाचे ठिकाणे
- हे कार्यक्रम मंत्रालयासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरे करणे अनिवार्य आहे.
- तसेच, हे परिपत्रक राज्यातील सर्व महाविद्यालये (Colleges) आणि सर्व शाळांनाही (Schools) लागू राहील, त्यामुळे तिथेही हे कार्यक्रम घ्यावे लागतील.
२. सुट्टीच्या दिवशीही कार्यक्रम
- एखादी जयंती किंवा राष्ट्रीय दिन हा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी (शनिवार व रविवार) किंवा स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असला, तरीही तो कार्यक्रम त्याच दिवशी साजरा करण्यात यावा.
- कार्यक्रमाचा दिवस किंवा वेळ बदलता येणार नाही, मात्र केंद्र शासनाने या संदर्भात कार्यक्रमात काही बदल सुचविल्यास, त्याप्रमाणे बदल करण्यात यावेत.
३. प्रशासकीय जबाबदारी
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांना हे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना द्यायच्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यायची आहे.
४. कार्यक्रमाचे स्वरूप (Nature of Program)
बहुतेक दिवशी महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे हे मुख्य स्वरूप असेल, परंतु काही विशिष्ट दिवशी खालीलप्रमाणे कृती करणे अपेक्षित आहे.
- दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस (२१ मे): या दिवशी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासोबतच ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ’ घेणे आवश्यक आहे.
- सद्भावना दिवस (२० ऑगस्ट): या दिवशी सद्भावना दिवसाची शपथ घेणे.
- राष्ट्रीय एकता दिवस (३१ ऑक्टोबर): वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ’ घेणे.
- संविधान दिवस (२६ नोव्हेंबर): या दिवशी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन करणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीय एकात्मता दिन (१९ नोव्हेंबर): इंदिरा गांधी जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेणे.
- शहीद दिन (२३ मार्च): शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या तिघांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
५. भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन : १३ सप्टेंबर २०२६ रोजी येणाऱ्या या दिवसाबाबतचे आदेश शासनाकडून स्वतंत्ररित्या निर्गमित केले जातील.
शासन निर्णय २०२६ मधील जयंती आणि राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी येथे डाउनलोड करा












