राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी भरपगारी रजेची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २९ महानगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 15 January Holiday Maharashtra मिळणार असून, त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
पगारी सुट्टी जाहीर, कोणाला मिळणार लाभ?
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३० डिसेंबर २०२५ रोजी याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, दिनांक १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही सुट्टी लागू असणार आहे.
विशेष म्हणजे, हा नियम केवळ सरकारी कार्यालयांपुरता मर्यादित नसून तो सर्व खाजगी आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आयटी कंपन्या (IT Companies), शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्सना देखील बंधनकारक असणार आहे.
अनेकदा कर्मचारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने स्पष्ट केले आहे की, जे कामगार किंवा अधिकारी निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात मतदार आहेत, मग ते कामासाठी त्या क्षेत्राबाहेर असले तरीही, त्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी रजा देण्यात यावी.
म्हणजेच, जर तुम्ही मतदार असाल तर 15 January Holiday Maharashtra चा लाभ घेऊन तुम्ही पगार न कपाता मतदानाला जाऊ शकता.
सन 2026 वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर
पूर्ण सुट्टी शक्य नसल्यास काय?
काही क्षेत्रे अशी आहेत जिथे काम थांबवणे शक्य नसते (उदा. अत्यावश्यक सेवा किंवा सतत चालणारी प्रक्रिया). अशा अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित आस्थापनेने कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, ही सवलत मिळणे हा कर्मचाऱ्याचा हक्क राहील.
मालकांवर कारवाईचा इशारा मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ अन्वये मतदारांना हा हक्क बजावता यावा यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
जर कोणत्याही कंपनीने किंवा आस्थापनेने कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत नाकारली आणि त्याबाबतची तक्रार प्राप्त झाली, तर संबंधित आस्थापनेविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.
त्यामुळे आता 15 January Holiday Maharashtra निमित्त मिळणाऱ्या या सुट्टीचा उपयोग करून, प्रत्येक सुजाण नागरिकाने आणि कर्मचाऱ्याने आपले पवित्र मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : 15 जानेवारी सार्वजनिक सुट्टी शासन निर्णय डाउनलोड करा










