Maharashtra New Healthcare Centers Recruitment GR 2025 : महाराष्ट्र शासनाने नवीन आरोग्य संस्था आणि श्रेणीवर्धित रुग्णालयांसाठी पदनिर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 75% बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांमध्ये पदनिर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आरोग्य विभागाने निर्गमित केला आहे.
Table of Contents
नवीन आरोग्य संस्था आणि मंजूर पदसंख्या
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी 837 नवीन नियमित पदे आणि 1233 कुशल/अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
47 नवीन उपकेंद्रे (Sub-centers)
प्रत्येक उपकेंद्रासाठी
- 1 बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता (MPW) – वेतनश्रेणी S-8 (₹25,500 – ₹81,100)
- 1 सहाय्यक परिचारिका प्रसविका (ANM) – वेतनश्रेणी S-8 (₹25,500 – ₹81,100)
- एकूण 94 नियमित पदे आणि 47 अंशकालीन स्त्री परिचारिका पदे (बाह्ययंत्रणेद्वारे)
16 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC)
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी
- 2 वैद्यकीय अधिकारी (MBBS) – वेतनश्रेणी S-20 (₹56,100 – ₹1,77,500)
- 2 आरोग्य सहाय्यक – वेतनश्रेणी S-9 (₹26,400 – ₹83,600)
- 1 सहाय्यक परिचारिका प्रसविका – वेतनश्रेणी S-8 (₹25,500 – ₹81,100)
- एकूण 80 नियमित पदे आणि 160 बाह्य सेवा कर्मचारी
शासन निर्णय: समुदाय संसाधन व्यक्ती, प्रेरिका, सखी यांना वाढीव दराने मानधन मंजूर
बाह्ययंत्रणेद्वारे (Private Contract)
- औषध वितरण अधिकारी
- कनिष्ठ लिपिक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- सफाई कर्मचारी
- वाहनचालक
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
4 नवीन ग्रामीण रुग्णालये (Rural Hospitals)
- प्रत्येक रुग्णालयासाठी:
- 1 वैद्यकीय अधीक्षक (S-23 – ₹67,700 – ₹2,08,700)
- 3 वैद्यकीय अधिकारी (S-20 – ₹56,100 – ₹1,77,500)
- 3 परिचारिका (S-13 – ₹35,400 – ₹1,12,400)
- 1 सहाय्यक अधीक्षक (S-13 – ₹35,400 – ₹1,12,400)
- 1 औषधनिर्माता (S-10 – ₹29,200 – ₹92,300)
- 1 कनिष्ठ लिपिक (S-6 – ₹19,900 – ₹63,200)
एकूण 40 नियमित पदे आणि 64 बाह्य सेवा कर्मचारी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
2 नवीन स्त्री रुग्णालये (Women’s Hospitals)
- 42 नियमित पदे आणि प्रत्येकी 55 बाह्य सेवा कर्मचारी
- एकूण 84 नियमित पदे आणि 110 बाह्य सेवा कर्मचारी
प्रत्येक रुग्णालयात स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, परिचारिका, औषधनिर्माते, आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील.
लाडकी बहीण योजना ‘या’ महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत!
कोणते जिल्हे लाभार्थी ठरणार?
नवीन उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये नंदुरबार, अहमदनगर, सातारा, अकोला, पालघर, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, परभणी, लातूर, भंडारा, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत.
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
Maharashtra New Healthcare Centers Recruitment GR 2025
➡ संपूर्ण पदभरती आणि निवड प्रक्रिया लवकरच जाहीर होणार!
अधिक माहितीसाठी : सविस्तर दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजीचा आरोग्य विभागाचा शासन निर्णय पाहा
आरोग्य विभागाच्या नवीन भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी https://phd.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
भारतीय नौदलात भरती – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) पदांची मोठी भरती