अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती Maharashtra Anganwadi Bharti 2025

By Marathi Alert

Updated on:

Maharashtra Anganwadi Bharti 2025 : महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या मंजूरी नुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या तब्बल 18 हजार 882 रिक्त पदे भरण्यासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. Maharashtra Anganwadi Bharti साठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, मिळणारा पगार आणि अर्ज कोठे करावा? याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

भरतीची संपूर्ण माहिती

महिलांकरिता रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची सुमारे 18,000 रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच उल्लेख महामहीम राज्यपाल महोदयांनी केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत राज्यात एकूण १,१०,५९१ अंगणवाडी केंद्रातील ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनिस रिक्त पदे भरण्यात येत आहे. इच्छूकांनी अर्ज करावे असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केले आहे.

भरती प्रकल्प: एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS)
एकूण रिक्त पदे

  • अंगणवाडी सेविका: 5,639
  • अंगणवाडी मदतनीस: 13,243
  • अर्जाची अंतिम तारीख: 31 मार्च 2025
  • भरती ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (त्या-त्या जिल्हा, तालुका निहाय)

ही सर्व रिक्त पदे दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी भरण्यात येणार आहे. राज्यातील बाल विकास प्रकल्प क्षेत्रातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवारांनी त्यांचे निवासी क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध जाहिराती (Maharashtra Anganwadi Bharti) नुसार या पदाकरीता अर्ज करावेत.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आनंदाची बातमी, मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी भरती!

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पगार । Anganwadi Sevika, Madatnis Salary

  1. अंगणवाडी सेविका – 10 हजार रुपये
  2. मिनी अंगणवाडी सेविका – 7200 रुपये
  3. अंगणवाडी मदतनिस (Anganwadi Madatnis Salary) – 5525 रुपये

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आनंदाची बातमी, मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी भरती!

अंगणवाडी भरती आवश्यक पात्रता । Anganwadi Recruitment Eligibility

  1. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सुधारित शासन निर्णय पाहा)
  2. स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  3. अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष) (लगेच चेक करा येथे तुमचे वय Age Calculator Online By Date Of Birth)
  4. लहान कुटुंब पात्रता आवश्यक (उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत)
  5. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  6. याव्यतिरिक्त जाहिरातीमध्ये नमूद इतर पात्रता असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2025! कोणतीही परीक्षा नाही – थेट मेरिट लिस्टवर निवड!

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती आवश्यक कागदपत्रे । Anganwadi Bharti Maharashtra Documents List

  1. शैक्षणिक पात्रता संबंधित 10 वी, 12 वी, पदवीधर व इतर (सर्व कागदपत्रे)
  2. जन्म दाखला
  3. आधार कार्ड
  4. रेशन कार्ड
  5. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  6. जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
  7. रहिवासी दाखला
  8. उत्पन्नाचा दाखला
  9. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
  10. स्थानिक रहिवासी असलेल्या बाबतचा दाखला
  11. जाहिरातीमध्ये नमूद संबंधित कागदपत्रे

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३७१ पदांची या जिल्ह्यात भरती! 

अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज कोठे करावा?

Maharashtra Anganwadi Bharti साठी इच्छुक महिला उमेदवारांनी तुमच्या तालुका/मनपा स्तरावरील संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) यांच्या कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.

तसेच स्थानिक वृत्तपत्रात देखील जाहिरातीची अधिसूचना दिली जाते. त्याचबाबरोबर तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाहिरात (Maharashtra Anganwadi Bharti) चेक करू शकता. त्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट (उदा. https://jalna.gov.in/) याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता. याप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून पुढे gov.in असे गुगल वर सर्च करायचे आणि अधिकृत वेबसाईटवर चेक करायचे आहे.

अधिक माहितीसाठी : मात्र यावर विसंबून न राहता तुमच्या तालुका किंवा मनपा स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) यांच्या कार्यालयात अधिक माहिती घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईट : icds.gov.in

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू

Maharashtra Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाडयांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचा-यांच्या नियुक्ती संदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे.

सुधारित अटी व शर्ती नुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळसेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ नुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुधारित गुणांकन शैक्षणिक अहर्ता तपशील खालीलप्रमाणे

पात्रता आणि गुणांकन पद्धत

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुण

  • 80% पेक्षा जास्त = 60 गुण
  • 70.01 ते 80% = 55 गुण
  • 60.01 ते 70% = 50 गुण
  • 50.01 ते 60% = 45 गुण
  • 40% ते 50% = 40 गुण

अतिरिक्त गुण

  • पदवीधर: 10 गुण
  • पदव्युत्तर शिक्षण: 4 गुण
  • D.Ed / B.Ed: 2 गुण
  • MS-CIT किंवा मान्यताप्राप्त संगणक अभ्यासक्रम: 2 गुण
  • अनुभव (2 वर्षांहून अधिक): 5 गुण
  • विधवा / अनाथ उमेदवार: 10 गुण
  • SC/ST उमेदवार: 5 गुण
  • OBC / भटक्या विमुक्त जाती / EWS: 3 गुण

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळसेवेने पदभरतीस शासन पत्र दिनांक ०९,०९.२०२४ अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया (Maharashtra Anganwadi Bharti) तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे, अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Anganwadi Recruitment 2025 Official Website : Click Here

अंगणवाडी भरती शासन निर्णय Anganwadi Bharti GR

Anganwadi Bharti GR : दिनांक 30/01/2025 रोजीचा शासन निर्णय : अंगणवाडी भरती सुधारित शासन निर्णय येथे पाहा

दिनांक 13/12 /2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत.

दिनांक 11/08/2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत.

दिनांक 02/05/2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत.

दिनांक 02/02/2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत.

#AnganwadiBharti #MaharashtraAnganwadiBharti

MarathiAlert.com वर आम्ही तुम्हाला अचूक, उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि कर्मचारी अपडेट्स यांसारख्या विविध विषयांवर लेख लिहण्याचा आमचा 6 वर्षाचा अनुभव आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!