NHM Recruitment 2026: सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मिरा भाईंदर महानरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, १५ वा वित्त आयोग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रिक्तपदांची पदभरती करीता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान मिरा भाईंदर भरती

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम मिरा भाईंदर भरती

१५ वा वित्त आयोग मिरा भाईंदर भरती

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मिरा भाईंदर भरती

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती
- अर्ज करण्याची मुदत: १७ एप्रिल २०२६ ते ०४ मे २०२६ सायं. ५.०० वाजेपर्यंत.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, भाईंदर (प.), जि. ठाणे.
- महत्त्वाची अट: उमेदवारांनी विहित अर्जासोबतच दिलेला Google Form भरणे अनिवार्य आहे.
- अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अधिकृत वेबसाईट : https://www.mbmc.gov.in/
- ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
- अधिकृत जाहिरात PDF डाउनलोड करा
मिरा भाईंदर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP), १५ वा वित्त आयोग (नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर) व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत करारतत्वावर ठोक मानधनावर खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे.
जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी, विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतीसह दि. १७/०४/२०२६ ते दि.०४/०५/२०२६ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-४०११०१ येथे अर्ज सादर करावेत.
राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. पोस्टाने/टपालाने अर्ज स्वीकारण्यात येतील. मात्र विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत किंवा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
सदरकामीची सविस्तर जाहीर सूचना मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या https://www.mbme.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.







