India Post GDS 2nd Merit List 2026: पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी यादी PDF Download Direct Link

Published On: April 10, 2026
Follow Us
India Post GDS 2nd Merit List 2026 PDF Download Direct Link

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देखील इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती २०२६ साठी अर्ज केला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या भरतीची पहिली गुणवत्ता यादी ६ मार्च २०२६ रोजी जाहीर झाली आहे आणि आता लाखो उमेदवार GDS दुसरी गुणवत्ता यादी 2026 यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर यांसारख्या एकूण २८,६३६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की दुसरी यादी (GDS 2nd Merit List 2026 PDF Download) कधी येणार आणि तुम्ही ती कशी तपासू शकता.

India Post GDS 2nd Merit List 2026: दुसरी यादी कधी जाहीर होणार?

पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता दुसरी यादी राज्यनिहाय म्हणजेच सर्कलनुसार जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ही 23 मार्च पर्यंत होती.

म्हणजेच आता India Post GDS 2nd Merit List 2026 एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून त्यांच्या राज्याची पीडीएफ डाउनलोड करून आपला निकाल सहज पाहता येईल.

India Post GDS 2nd Merit List 2026 डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून निकाल तपासणे अत्यंत सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इंडिया पोस्टच्या https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला GDS Online Engagement Schedule-I, January-2026 : List-II of Shortlisted Candidates Published असा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य किंवा ज्या सर्कल मधून अर्ज केला आहे ते निवडायचे आहे. हे केल्यावर मेरिट लिस्टची पीडीएफ तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. या पीडीएफमध्ये तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर सर्च करून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तपासू शकता.

गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांना कोणती माहिती पाहायला मिळेल?

जेव्हा तुम्ही India Post GDS 2nd Merit List 2026 ची पीडीएफ डाऊनलोड कराल, तेव्हा त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये प्रामुख्याने उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, दहावीच्या गुणांची टक्केवारी, उमेदवाराचा प्रवर्ग (कॅटेगरी) आणि कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातील आवश्यक माहिती समाविष्ट असते.

दोन उमेदवारांना समान गुण असल्यास निवडीचा नियम काय आहे?

अनेकदा असे होते की दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना दहावीत समान टक्केवारी असते. अशा वेळी इंडिया पोस्ट विशिष्ट नियमांच्या आधारे निवड करते. ज्या उमेदवाराचे वय जास्त असते, त्याला निवडीमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते. जर वयाच्या बाबतीतही समानता असेल, तर राखीव प्रवर्गातील महिला उमेदवारांना म्हणजेच एससी किंवा एसटी प्रवर्गातील महिलांना या प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते.

निवड झाल्यानंतर उमेदवारांना किती पगार मिळतो?

DAK SEVAK SALLERY

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार आणि इतर भत्ते दिले जातात. ब्रांच पोस्टमास्टर, ग्रामीण डाक सेवक आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला 10 हजार रुपये ते 29 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाते. यासोबतच त्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

यादीत नाव आल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल?

ज्या उमेदवारांचे नाव इंडिया पोस्ट जीडीएसच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत येईल, त्यांना अंतिम नियुक्ती मिळण्यापूर्वी कागदपत्र पडताळणी (Document Verification) प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे यादीत नाव आलेल्या सर्व उमेदवारांनी आपले मूळ दस्तऐवज (ओरिजिनल डॉक्युमेंट्स) तयार ठेवणे गरजेचे आहे.

GDS 2nd Merit List 2026 PDF Download

अधिक माहितीसाठी इंडिया पोस्ट ऑफिस भरतीच्या https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

GDS 2nd Merit List 2026 PDF Download – coming soon

India Post GDS Result 2026 Maharashtra List 1 PDF Download

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment