Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 1440 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि विविध आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरतीची संपूर्ण माहिती पाहूया.
Arogya Vibhag MO Bharti 2026: पदांची सविस्तर माहिती
या वैद्यकीय अधिकारी भरती अंतर्गत एकूण 1440 पदे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये खालील प्रमाणे पदे भरण्यात येत आहे.

- एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी – 766 पदे
- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – 674 पदे
- स्त्रीरोगतज्ञ – 167
- बालरोगतज्ञ – 122
- भूलतज्ञ – 340
- सर्जन – 33
- रक्त संक्रमण अधिकारी – 12
ही भरती सातवा वेतन आयोग वेतनस्तर एस-20 (₹56,100 ते ₹1,77,500) प्रमाणे आहे.
आरोग्य विभाग भरती 2026 महाराष्ट्र: आरक्षण व प्रवर्गनिहाय जागा
या वैद्यकीय अधिकारी गट अ जाहिरात अंतर्गत सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचे वाटप करण्यात आले आहे. खुला, एससी, एसटी, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आदी प्रवर्गांसाठी जागा राखीव आहेत.
- दिव्यांगांसाठी 110 पदे (O.L.-One Leg प्रकारासाठी)
- अनाथ प्रवर्गासाठी 14 पदे
- महिला व खेळाडूंसाठी स्वतंत्र आरक्षण
आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्रातील अधिवास (Domicile) धारक उमेदवारांना मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे
या (Arogya Vibhag MO Bharti 2026) प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी खालील शैक्षणिक आणि तांत्रिक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- एम.बी.बी.एस. पदासाठी: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. (MBBS) पदवी असणे आवश्यक आहे.
- विशेषज्ञ पदांसाठी: संबंधित विषयांमधील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) किंवा पदविका असणे गरजेचे आहे.
- अर्जाच्या अंतिम दिनांकापूर्वी उमेदवारांची आंतरवासिता (Internship) पूर्ण झालेली असावी.
- उमेदवाराकडे महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) किंवा भारतीय वैद्यक परिषद (NMC) यांचे वैध नोंदणी प्रमाणपत्र (किंवा नूतनीकरण पावती) असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे (अमागास वर्गासाठी) असावे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे. प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी वयाची अट ४३ वर्षे असून, दिव्यांग उमेदवारांसाठी ती ४५ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया व गुणांकन पद्धत
या (Arogya Vibhag MO Bharti 2026) प्रक्रियेत उमेदवारांची निवड ही एकूण १०० गुणांच्या मूल्यमापनावर आधारित असेल. गुणांचे विभाजन पारदर्शकपणे खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:
- पदवी परीक्षेच्या सर्व वर्षांच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी: ५० गुण
- पदव्युत्तर पदविका/पदव्युत्तर पदवी असल्यास: २० गुण
- शासकीय सेवेतील कंत्राटी/बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी पदाचा अनुभव: जास्तीत जास्त ३० गुण (आदिवासी/नक्षलग्रस्त भागात प्रत्येक ११ महिन्यांसाठी १० गुण, तर बिगर आदिवासी भागात ५ गुण)
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
सदर पदांसाठी अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: २७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ११.०० वाजल्यापासून)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मार्च २०२६ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
अर्ज शुल्क: अराखीव प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी रु. ७००/- राहील.
आरोग्य विभाग भरती 2026: 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी PDF जाहिरात डाउनलोड
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठीची जाहिरात https://www.morecruitment.maha-arogya.com या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, तुम्ही PDF जाहिरात डाउनलोड करू शकता.
अधिकृत वेबसाईट: अर्ज भरण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.









