तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

Published On: July 22, 2026
Follow Us
talathi bharti notification 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (Maharashtra Group C Combined Preliminary Exam 2026) संदर्भात महत्त्वाचे शुद्धीपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार तलाठी भरती 2026 जाहिरात (Talathi) ग्राम महसूल अधिकारी पदासह विविध विभागांतील नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अर्ज करण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना अतिरिक्त मुदतही देण्यात आली आहे.

तसेच परीक्षा आता 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन (Offline OMR Based) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

महसूल व वन विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क या पदाचा समावेश करण्यात आला आहे. या पदासाठी एकूण 1,539 जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

एकूण किती पदांसाठी भरती होणार?

शुद्धीपत्रकानुसार आता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 द्वारे एकूण 3,088 पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे.

talathi bharti notification 2026
talathi bharti notification 2026 27
  • महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1,539 पदे
  • राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल – 11 पदे
  • राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील सहायक अधीक्षक – 11 पदे
  • कृषी व पदुम विभागातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – 254 पदे
  • नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय – 230 पदे
  • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील लिपिक-टंकलेखक – 155 पदे
  • आदिवासी विकास विभागातील लिपिक-टंकलेखक – 69 पदे
  • महसूल व वन विभागातील लिपिक-टंकलेखक – 480 पदे
  • महसूल व वन विभागातील नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक-टंकलेखक – 339 पदे

शैक्षणिक पात्रतेत काय अटी आहेत?

  • तलाठी पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
  • सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) पदासाठी मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.) आवश्यक आहे.
  • लिपिक-टंकलेखक पदांसाठी संबंधित जाहिरातीनुसार टंकलेखन (Typing) पात्रता आवश्यक राहील.

अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख

शुद्धीपत्रकानुसार उमेदवारांना अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 5 ऑगस्ट 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
  • ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 8 ऑगस्ट 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत

परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन माध्यमातूनच भरावे लागेल. डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card), नेट बँकिंग (Net Banking) किंवा यूपीआय (UPI) या माध्यमांचा वापर करता येईल. चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.

परीक्षा कधी होणार? | MPSC Group C Exam Date 2026

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आता 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन OMR पद्धतीने घेतली जाणार आहे.

ज्या उमेदवारांनी पूर्वी अर्ज केला नव्हता, त्यांनी नव्याने समाविष्ट झालेल्या पदांसाठी पात्र असल्यास मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्ज करावा. आयोगाने स्पष्ट केले आहे की, पूर्वी पदांचा समावेश नसल्यामुळे अर्ज न केल्याची तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही.

तसेच मूळ जाहिरात आणि यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत लागू राहतील.

MPSC Group Cसुधारित जाहिरात PDF डाउनलोड
MPSC Group CNotification PDF Download
MPSC अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment