MPSC Group C Notification 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, शारीरिक अर्हता तसेच टंकलेखनाची अट जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे असल्याने अधिकृत अधिसूचनेनुसार अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
या लेखामध्ये MPSC Group C अंतर्गत उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI), कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, शारीरिक निकष आणि टंकलेखन पात्रतेची अधिकृत अधिसूचनेवर आधारित सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
MPSC Group C संवर्ग व विभाग निहाय पदांचा तपशील
MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील जाहिरातीनुसार संवर्गनिहाय व विभागनिहाय पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे.

- उद्योग निरीक्षक (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) – 9 पदे.
- तांत्रिक सहाय्यक (वित्त विभाग) – 3 पदे.
- सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) (गृह विभाग) – 462 पदे.
- कर सहाय्यक (गट-क) (वित्त विभाग) – 282 पदे.
- लिपिक-टंकलेखक संवर्ग – एकूण 1864 पदे.
- एकुण पदे – 2619
MPSC Group C पदनिहाय वेतनश्रेणी

| पद | वेतन स्तर | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| उद्योग निरीक्षक | S-13 | ₹35,400 – ₹1,12,400 |
| तांत्रिक सहाय्यक | S-10 | ₹29,200 – ₹92,300 |
| कर सहाय्यक | S-8 | ₹25,500 – ₹81,100 |
| लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) | S-6 | ₹19,900 – ₹63,200 |
| सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) | S-14 | ₹36,600 – ₹1,22,800 |
MPSC Group C आवश्यक शैक्षणिक (शारिरीक, टंकलेखक) अहर्ता
MPSC Group C 2026 : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक, शारीरिक व टंकलेखन अहर्ता
उद्योग निरीक्षक
• मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
तांत्रिक सहाय्यक
• संबंधित शाखेतील आवश्यक तांत्रिक पदवी/पदविका.
कर सहाय्यक
• कोणत्याही शाखेची पदवी.
• मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट (GCC किंवा समकक्ष प्रमाणपत्र) आवश्यक.
लिपिक-टंकलेखक
• कोणत्याही शाखेची पदवी.
• मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट (GCC किंवा समकक्ष प्रमाणपत्र) आवश्यक.
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)
• एसएससी (10 वी) उत्तीर्ण.
• ऑटोमोबाईल/मेकॅनिकल अभियांत्रिकीतील किमान 3 वर्षांची पदविका किंवा समकक्ष पात्रता.
• वैध वाहनचालक परवाना आवश्यक.
• विहित शारीरिक पात्रता आवश्यक.
• टंकलेखन पात्रता आवश्यक नाही.
AMVI साठी शारीरिक पात्रता
• पुरुष उमेदवारांची किमान उंची : 163 से.मी.
• महिला उमेदवारांची किमान उंची : 155 से.मी.
• विहित दृष्टीमान व वैद्यकीय पात्रता आवश्यक.
MPSC Group C आवश्यक वयोमर्यादा
MPSC Group C भरतीसाठी उमेदवाराचे वय संबंधित पदानुसार निश्चित करण्यात आले आहे. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) आणि लिपिक-टंकलेखक या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे. तर कर सहाय्यक पदासाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे आहे. वयाची गणना आयोगाने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता दिनांकानुसार केली जाईल.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र उमेदवार, अनाथ, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, दिव्यांग तसेच माजी सैनिकांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात येते. त्यामुळे आरक्षण प्रवर्गानुसार उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत अतिरिक्त सवलतीचा लाभ देण्यात येतो.

MPSC Group C परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
MPSC Group C परीक्षेचे स्वरूप
MPSC Group C भरती प्रक्रिया प्रामुख्याने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि लागू पदांसाठी टंकलेखन चाचणी अशा टप्प्यांत पार पडते. पूर्व परीक्षा ही पात्रता निश्चित करण्यासाठी असते, तर अंतिम गुणवत्ता यादी मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाते. कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांसाठी आवश्यक टंकलेखन पात्रता लागू असते.
पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ (MCQ) स्वरूपाची असते. परीक्षेत 100 प्रश्न, 100 गुण आणि 60 मिनिटांचा कालावधी असतो. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असते.
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
पूर्व परीक्षेत चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षा पदनिहाय घेतली जाते. बहुतांश पदांसाठी दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयांचा समावेश असतो, तर दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य क्षमता चाचणी आणि संबंधित पदाचा तांत्रिक किंवा विषयनिहाय अभ्यासक्रम असतो. सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी स्वतंत्र विषयनिहाय मुख्य परीक्षा घेतली जाते.

MPSC Group C महत्वाच्या तारखा

MPSC Group C Notification 2026 PDF Download
| MPSC Group C | Notification PDF Download |
| MPSC अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |








