अमृत मानस मित्र प्रशिक्षण 2026: मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; संपूर्ण माहिती

Published On: June 25, 2026
Follow Us
amrut-manas-mitra-training-2026

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचसाठी इच्छुक उमेदवारांना 29 जून 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक करिअर घडविण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे तांत्रिक सहकार्य

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची अग्रगण्य संस्था महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच), पुणे तांत्रिक आणि शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. संस्थेच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून सहभागी उमेदवारांना व्यावसायिक दर्जाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रशिक्षणात कोणत्या विषयांचा समावेश?

प्रशिक्षणामध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, प्रभावी संवाद कौशल्ये, सक्रिय ऐकणे, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये तसेच मानससामाजिक सहाय्य या विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असेल?

या प्रशिक्षणाची सुरुवात पुणे येथे 15 दिवसांच्या ऑफलाइन प्रशिक्षणाने होईल. या कालावधीत इंटरॅक्टिव्ह सत्रे, केस स्टडीज, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपक्रम तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल.

यानंतर एक महिन्याचा प्रॅक्टिकल फील्ड एक्सपोजर दिला जाईल. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला जिल्हा स्तरावरील एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयाशी जोडण्यात येईल, जेणेकरून प्रत्यक्ष समुपदेशनाचा अनुभव मिळू शकेल.

त्यानंतर पुढील 3 ते 5 महिने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमार्फत नियमित मॉनिटरिंग, मेंटरिंग, ऑनलाइन सत्रे, प्रत्यक्ष कामातील अडचणींचे निराकरण, व्यावसायिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहाय्य दिले जाणार आहे.

प्रशिक्षणानंतरही मिळणार मार्गदर्शन

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही उमेदवारांना महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच) च्या तज्ज्ञांकडून नियमित ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार आहे.

यामध्ये केस डिस्कशन, ऑनलाइन सुपरव्हिजन, मेंटरिंग सत्रे, प्रत्यक्ष कामातील अडचणींचे निराकरण तसेच व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी सातत्यपूर्ण सहाय्याचा समावेश असेल. त्यामुळे प्रशिक्षणानंतरही उमेदवारांना अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.

अधिकृत संयुक्त प्रमाणपत्र मिळणार

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच) यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करताना उपयुक्त ठरू शकते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी सुसंगत उपक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी

अमृत मानस मित्र प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्याबरोबरच सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि समुपदेशन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. तसेच व्यावसायिक नेटवर्किंगचीही संधी उपलब्ध होणार आहे.

पात्रता निकष

या प्रशिक्षणासाठी खालीलपैकी कोणतीही पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

  • एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र
  • एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र
  • मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू)

याशिवाय मानसिक आरोग्य किंवा समुपदेशन क्षेत्रात पूर्वीपासून कार्यरत आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रशिक्षण पूर्णपणे मोफत

अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. मात्र प्रशिक्षणासाठी आवश्यक निवास, भोजन आणि राहण्याचा खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागणार आहे.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवारांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर ओरिएंटेशन सत्र, आवश्यक परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव विचारात घेतला जाईल. तसेच ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसारही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जून 2026 आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

अधिकृत वेबसाईटऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टल 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू; या तारखेपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक

August 7, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026
NHM CHO Exam Date 2026

मोठी अपडेट! राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत CHO भरती परीक्षेची तारीख जाहीर

August 1, 2026
mpsc exam update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय! CBT परीक्षा पद्धती स्थगित; पूर्व परीक्षा OMR पद्धतीनेच होणार

July 23, 2026

Leave a Comment