आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२६-२७: प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

Published On: July 9, 2026
Follow Us
rte-25-admission-third-round-selection-list-2026

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ (RTE २५%) नुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असून, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेला २५ जून २०२६ पासून अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे. ज्या पालकांच्या पाल्यांचे नाव या तिसऱ्या प्रतीक्षा यादीत आहे, त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १० जुलै २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

RTE Admission 2026-27: 2.89 लाख अर्जांपैकी 1.05 लाख विद्यार्थ्यांची निवड; आतापर्यंत 96 हजारांहून अधिक प्रवेश निश्चित

RTE 25 ADDMISSION 9 JULY UPDATE

आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया (RTE Admission 2026-27) संदर्भातील ताज्या डॅशबोर्डनुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एकूण 2,89,286 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अद्याप 86,034 विद्यार्थी प्रतीक्षा (Waiting Selection) यादीत असून, नियमित व प्रतीक्षा यादीतील विविध फेऱ्यांमधून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

आतापर्यंतच्या प्रवेशाची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:

  • पहिली नियमित निवड यादी (1st Regular Selection List) मधून प्रवेश : 79,499
  • पहिली प्रतीक्षा यादी (1st Waiting Selection List) मधून प्रवेश : 12,900
  • दुसरी प्रतीक्षा यादी (2nd Waiting Selection List) मधून प्रवेश : 3,294
  • तिसरी प्रतीक्षा यादी (3rd Waiting Selection List) मधून प्रवेश : 915

याप्रमाणे आतापर्यंत एकूण 96,608 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी आरटीई पोर्टलवरील आपल्या अर्जाची स्थिती नियमित तपासावी. तसेच पुढील प्रतीक्षा यादी किंवा रिक्त जागांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून जाहीर होणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

तिसऱ्या टप्प्यात प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपला प्रवेश वेळेत निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरताना जी कागदपत्रे पोर्टलवर नोंदवली होती, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित (Attested) प्रती सोबत ठेवणे आवश्यक आहे.

पडताळणी समितीकडे जाताना पालकांनी पोर्टलवरून मिळालेले अलॉटमेंट लेटर आणि हमी पत्राची प्रिंट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर समितीकडून प्रवेश ऑनलाईन निश्चित करून त्याची पावती (Receipt) घेणे पालकांनी विसरू नये.

तंत्रज्ञानाचा वापर करताना पालकांनी काही विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. निवड झालेल्या पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील, परंतु केवळ या एसएमएसवर अवलंबून न राहता, पालकांनी आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची खात्री स्वतः करावी.

ॲडमिट कार्ड किंवा अलॉटमेंट लेटर काढण्यासाठी लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, सर्व माहिती याच टॅबवर उपलब्ध आहे. तसेच, जे विद्यार्थी अद्याप प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांनीही याच पर्यायाचा वापर करून आपल्या अर्जाची अद्ययावत स्थिती तपासावी. सध्या सुरू असलेल्या फेरीची मुदत संपल्यानंतरच पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना क्रमाने एसएमएस पाठवले जातील.

आरटीई प्रवेशाचा हा तिसरा टप्पा अनेक वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारा आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना या प्रक्रियेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकांनी कोणतीही घाई किंवा गोंधळ न करता, आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३ जुलै २०२६ च्या आत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.

RTE 25% Admission PortalOfficial Website
RTE Admission Circular jun july 2026

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment