आरटीई (RTE Lottery) जिल्हानिहाय लॉटरी लिस्ट डाउनलोड डायरेक्ट लिंक

Published On: May 15, 2026
Follow Us
RTE Lottery List PDF Download

RTE Lottery List PDF Download: आरटीई (RTE) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची निवड List No 1 मूळ निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया नंतर आता RTE दुसरी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याना संधी मिळाली आहे. निवड यादीतील (List No. 2) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 15 मे 2026 ते 23 मे 2026 पर्यंत देण्यात आली आहे.

यंदा ६ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते, त्यांना आता ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. जिल्ह्यानुसार निवड यादी कशी डाऊनलोड करायची आणि अर्जाची स्थिती कशी तपासायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • RTE Lottery Selection List 2 Date: 15/05/2026
  • Admission Regular Selection List 2 Last Date: 15/05/2026 to 23/05/2026

आरटीई लॉटरी निवड यादी (District Wise List) कशी डाऊनलोड करावी? | RTE Lottery Result List PDF Download

जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण जिल्ह्याची किंवा विशिष्ट शाळेची निवड यादी पाहायची असेल, तर तुम्ही खालील पायऱ्यांचे अनुसरण करून पीडीएफ (PDF) डाऊनलोड करू शकता.

Lottery list
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी आरटीई प्रवेशाच्या अधिकृत पोर्टलवर (https://student.maharashtra.gov.in/adm_portal/) जा.
  • निवड यादी (Selected / मूळ निवड यादी) पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर Academic Year 2026-2027 निवडा
  • जिल्हा निवडा (Select District): ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जाऊन तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा.
  • आता Selection List 1 किंवा Selection List 2 हा पर्याय निवडा.
  • ‘Go’ बटणावर क्लिक करा: माहिती भरल्यानंतर ‘Go’ बटणावर क्लिक करताच तुमच्यासमोर निवडलेल्या जिल्ह्याची यादी दिसेल.
  • PDF डाऊनलोड करा: ‘Download List’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ही यादी आपल्या मोबाईल किंवा संगणकावर सेव्ह करू शकता.

अर्जाची स्थिती (Application Wise Status) कशी चेक करावी? | RTE Lottery Result Application No Wise Status Online Check

तुमच्या पाल्याची निवड झाली आहे की नाही, हे वैयक्तिकरित्या तपासण्यासाठी ‘अॅप्लिकेशन नंबर’चा वापर करणे सर्वात सोपा मार्ग आहे.

लॉगिन न करता चेक करा: आरटीई पोर्टलवर ‘Application Wise Details‘ हा टॅब दिसेल. तिथे तुमच्या पाल्याचा ‘Application Number‘ टाकून तुम्ही अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.

Application Wise rte result

निवड झाल्यास: जर पाल्याची निवड झाली असेल, तर तिथे ‘Selected’ असे दिसेल आणि कोणत्या शाळेत निवड झाली आहे, त्याचे नावही तिथे नमूद असेल.

प्रतीक्षा यादी: जर मूळ यादीत नाव नसेल, तर पाल्याचे नाव ‘Waiting List’ मध्ये आहे का, हे देखील तुम्ही तिथेच तपासू शकता.

अलॉटमेंट लेटर: निवड झालेल्या पालकांनी आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून ‘Allotment Letter‘ ची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. हे पत्र प्रवेशाच्या वेळी शाळेत जमा करावे लागते.

निवड झालेल्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) प्राप्त होतील. मात्र, तांत्रिक कारणांमुळे एसएमएस येण्यास उशीर होऊ शकतो, त्यामुळे पालकांनी पोर्टलवर जाऊन स्वतः निकाल तपासणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी पोर्टलवर दर्शविलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

  • RTE Lottery Regular Selection List 1 Date: 10/04/2026
  • Admission Regular Selection List 1 Last Date: 10/04/2026 to 08/05/2026

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment