कामगार आयुक्तालय भरती 2026: PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Published On: May 14, 2026
Follow Us
kamgar aayuktalay bharti 2026

कामगार आयुक्तालय भरती 2026: महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून विभागाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

कामगार आयुक्तालय भरती 2026

कामगार आयुक्तालय भरती 2026 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण ७८ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचा तपशील

  • निरीक्षक – ६२
  • लेखापाल – १२
  • लघुटंकलेखक – ०४
  • एकूण पदे – ७८

वेतनश्रेणी

  • निरीक्षक: S-13 : रु. 35400-112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
  • लेखापाल: S-13 : रु. 35400-112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
  • लघुटंकलेखक: S-8 : रु. 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

टिप- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे.

आवश्यक वयोमार्यादा

kamgar aayuktalay bharti age limit

आवश्यक शैक्षणिक अर्हता

निरीक्षक, गट-क संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आवश्यक आहे.

लेखापाल, गट-क संवर्गाकरीता सांविधिक विदयापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी आणि लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

लघुटंकलेखक, गट-क संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

वरील सर्व पदांकरिता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

आवश्यक टंकलेखन अर्हता

लघुटंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे.

लघुटंकलेखक : इंग्रजी व मराठी लघुलेखन ८० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक एसपीई १०१२/(१०८/१२) साशि-१. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१३ अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट आणि बेसिक कोर्स इन कॉम्प्यूटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट (लागू असेल त्याप्रमाणे) समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे.

अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक

परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.

शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची सिहित टंकलेखन अर्हता विभागाकडून निश्चित करण्यात येणा-या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापुर्वी धारण करणे अनिवार्य आहे.

कामगार आयुक्तालय भरती 2026 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी : : दिनांक १३.०५.२०२६ रोजी दिनांक ११.०६.२०२६ रोजी २३:५५ वाजेपर्यंत
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक १२.०६.२०२६ रोजी २३:५५ वाजेपर्यंत

कामगार आयुक्तालय भरती 2026 PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment