RTE Admission Second Round Announced 2026 : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क (RTE Act 2009) कायद्यांतर्गत राबवल्या जाणाऱ्या RTE २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 4 जून पासून सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर झालेल्या या दुसऱ्या फेरीमुळे पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेल्या आणि प्रतीक्षा यादीत (Wating List) असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्ही लगेच RTE च्या पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून स्थिती चेक करू शकता. डायरेक्ट डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे.
आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत या तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार
RTE प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची ही प्रक्रिया ४ जून २०२६ पासून सुरू झाली असून, पालकांना १२ जून २०२६ पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. पहिल्या फेरीतील प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी या दिलेल्या मुदतीत आवश्यक ती सर्व कार्यालयीन कार्यवाही पूर्ण करून शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टल वरील आकडेवारीनुसार, या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी निवड करण्यात आली होती. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, पहिल्या नियमित निवड यादीतील ७९ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. तसेच, पहिल्या प्रतीक्षा यादीतूनही १२ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे.

RTE प्रवेशासाठी पालकांचे हमीपत्र: नमुना, PDF डाउनलोड डायरेक्ट लिंक
आता उर्वरित जागांसाठी ८६ हजार ३४ प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांमधून या दुसऱ्या फेरीत प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित पालकांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता, लवकरात लवकर शाळेत जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करावे.
आरटीई 25 टक्के प्रवेश निवड यादी 3 येथे डाउनलोड करा – डायरेक्ट लिंक
आरटीई प्रवेशासाठी पालकांना महत्त्वाच्या सूचना (२०२६-२७)
- प्रवेशाची मुदत: तिसऱ्या निवड यादीत (List No. 3) नाव आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ४ जून २०२६ ते १२ जून २०२६ ही मुदत देण्यात आली आहे.
- आवश्यक कागदपत्रे: ऑनलाईन अर्ज भरताना जी कागदपत्रे नमूद केली होती, त्या सर्वांच्या मूळ (Original) आणि झेरॉक्स (साक्षांकित) प्रती सोबत ठेवाव्यात.
- अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र: प्रवेशासाठी जाताना अलॉटमेंट लेटरची प्रिंट (स्वतःच्या लॉगिनमधून किंवा समितीकडून मिळवावी) आणि आरटीई पोर्टलवरील हमीपत्राची प्रिंट आवर्जून सोबत घेऊन जावी.
- प्रवेशाची पावती: पडताळणी समितीकडे वेळेत जाऊन कागदपत्रे तपासावीत आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाल्यावर समितीकडून त्याची पावती (Receipt) नक्की घ्यावी.
- एसएमएसवर अवलंबून राहू नका: प्रवेशाबाबतचा मेसेज मोबाईलवर येईलच असे नाही. त्यामुळे पोर्टलवरील “अर्जाची स्थिती” या टॅबवर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे की नाही, याची स्वतः खात्री करा.
- ॲडमिट कार्ड: ॲडमिट कार्ड काढण्यासाठी लॉगिन करण्याची गरज नाही, त्यासाठी पोर्टलवरील “अर्जाची स्थिती” या टॅबचाच वापर करावा.
- प्रतीक्षा यादीतील (Waiting List) विद्यार्थ्यांसाठी: प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांनीही “अर्जाची स्थिती” टॅबवर जाऊन आपला नंबर तपासावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशाची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना क्रमाने एसएमएस पाठवले जातील.
अधिक माहितीसाठी : आरटीई 25 टक्के प्रवेश अधिकृत पोर्टल







