नवीन शैक्षणिक वर्षातील शालेय सुटयांची यादी जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक

Published On: June 7, 2026
Follow Us
School Holiday List 2026 27

School Holiday List 2026 27: नवीन शैक्षणिक वर्षाचे वेध लागलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शालेय सुटयांची यादी जाहीर केली असून, याबाबत परिपत्रक नुकतेच निर्गमित केले आहे.

शालेय सुटयांची यादी नुसार नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून २०२६ रोजी होणार असून, विद्यार्थी आणि पालकांना आतापासूनच आपल्या वर्षभराच्या सुट्ट्यांचे अचूक नियोजन करता येणार आहे.

प्रथम सत्र आणि दिवाळी सुट्टीची घोषणा शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, यंदाचे पहिले सत्र सोमवार, १५ जून २०२६ रोजी सुरू होऊन ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालेल.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वात जिव्हाळ्याच्या दिवाळी सुट्टीला सुरुवात होईल. यंदा दिवाळीची सुट्टी २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असणार आहे.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर लगेचच म्हणजे १६ नोव्हेंबर २०२६ पासून दुसरे सत्र सुरू होईल, जे १ मे २०२७ पर्यंत कार्यरत राहील.

उन्हाळी सुट्टी आणि शालेय कामकाजाचे नियम: दुसरे सत्र संपल्यानंतर सर्वांना प्रतीक्षा असते ती उन्हाळी सुट्टीची. शिक्षण विभागाच्या School Holiday List 2026 27 मधील माहितीनुसार, ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत शाळांना उन्हाळी सुट्टी असेल.

विशेष म्हणजे, माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण वर्षातील सुट्ट्यांचा आकडा ७६ दिवसांपेक्षा जास्त असू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एकूण कामाचे दिवस किमान २३० असणे बंधनकारक असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

सणांसाठी सुट्ट्यांचे समायोजनकाही शाळांना गणेशोत्सव किंवा नाताळ यांसारख्या सणांसाठी जास्तीची सुट्टी हवी असल्यास, त्यांना दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीत कपात करून सुट्ट्यांचे समायोजन करता येईल. मात्र, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

तसेच, शासनाने व मा. विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या सर्व सार्वजनिक आणि स्थानिक सुट्ट्या शाळांना पाळणे सक्तीचे आहे. यासोबतच १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यासाठी शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष (२०२७-२८) हे १५ जून २०२७ पासून सुरू होणार असल्याचेही या परिपत्रकाद्वारे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी : नवीन शैक्षणिक वर्षातील शालेय सुटयांची यादी डाउनलोड डायरेक्ट लिंक

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment