नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या तारखेपासून सुरू होणार, अधिकृत वेळापत्रक पहा

Published On: June 7, 2026
Follow Us
New Academic Year 2026 27 School Start Date

New Academic Year 2026 27 School Start Date : विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी आता संपत आली असून, सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष 2026 27 मध्ये शाळा कधी सुरू होणार? महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू होण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.

New Academic Year 2026 27 School Start Date

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागांमधील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, १५ जून २०२६ रोजी सुरू करण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यासाठी जरी १५ जून ही तारीख असली, तरी विदर्भातील हवामान लक्षात घेऊन शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जून महिन्यामध्ये विदर्भात असणारे कडक ऊन आणि वाढलेले तापमान विचारात घेता, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून २०२६ ते २९ जून २०२६ या सुरुवातीच्या कालावधीत फक्त सकाळच्या सत्रात भरवण्यात येतील. या काळात विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ७.०० ते ११.४५ या वेळेतच असेल. त्यानंतर, मंगळवार ३० जून २०२६ पासून या शाळा त्यांच्या नेहमीच्या नियमित वेळेनुसार पूर्ण वेळ सुरू करण्यात येतील.

नवीन शैक्षणिक वर्ष 2026 27 मधील शालेय सुटयांची यादी डाउनलोड डायरेक्ट लिंक

राज्य मंडळाव्यतिरिक्त राज्यातील इतर शिक्षण मंडळांच्या शाळांसाठी शासनाने काहीशी वेगळी मुभा दिली आहे. जर या इतर मंडळांच्या शाळा त्यांच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार सुरू असतील किंवा त्या शाळांमध्ये काही महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असतील, तर त्यांच्या प्रशासनाने आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट सूचना परिपत्रकात देण्यात आली आहे.

इयत्ता पहिली शाळा प्रवेश वय 2026 27: नवीन वयोमार्यादा जाणून घ्या

New Academic Year 2026 27 School Start Date

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment