कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांची भरती (KDMC Recruitment 2026) जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
KDMC Recruitment 2026
KDMC Recruitment 2026 या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ७५ रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, एपिडेमियॉलॉजिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि एएनएम अशा विविध महत्त्वपूर्ण पदांचा समावेश आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) पदासाठी १९ जागा, बालरोगतज्ज्ञ आणि एपिडेमियॉलॉजिस्ट पदासाठी प्रत्येकी १ जागा उपलब्ध आहे. तसेच महिला स्टाफ नर्ससाठी २३, लॅब टेक्निशियनसाठी ९, फार्मासिस्टसाठी १ आणि एएनएम पदासाठी २१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.


उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असून एमबीबीएस, एमडी, बारावी उत्तीर्ण सोबत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग, डी.फार्म, बी.फार्म अशा पात्रता धारकांना या कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती (Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti) प्रक्रियेत सहभागी होता येईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्षरित्या सादर करणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ आणि एपिडेमियॉलॉजिस्ट या पदांसाठी ३० जून २०२६ रोजी थेट मुलाखती (Walk in Interview) आयोजित केल्या आहेत.
स्टाफ नर्स आणि लॅब तंत्रज्ञ पदांसाठी १ जुलै २०२६ रोजी, तसेच फार्मासिस्ट आणि एएनएम पदांसाठी २ जुलै २०२६ रोजी अर्ज स्वीकारणे व छाननी प्रक्रिया पार पडेल. उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा पुरावा आणि अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत घेऊन ‘क’ प्रभाग कार्यालय, दुसरा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी फायर स्टेशन, कल्याण पश्चिम येथे सकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत उपस्थित राहावे.
ही पदभरती गुणांकन पद्धतीने आणि थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या माहितीचा वापर टाळावा. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आणि वेळोवेळी होणारे बदल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सरकारी नोकरीची ही संधी (KDMC Recruitment 2026) न गमावता पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे.
अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर जाहिरात व अर्जाचा नमूना डाउनलोड करा तसेच नवीन अपडेट साठी KDMC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
KDMC Recruitment 2026 PDF Download
| NUHM KDMC Recruitment 2026 | NUHM जाहिरात PDF |
| अर्ज नमूना | अर्जाचा नमूना |
| अधिकृत वेबसाईट | https://kdmc.gov.in/kdmc/ |









