11th Admission FYJC FAQ 2025 : वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ PDF Download

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th Admission FYJC FAQ 2025 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता 11 वी (FYJC) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली आहे. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होत आहे. शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) प्रसिद्ध केले असून, विद्यार्थी आणि पालकांसाठी हे महत्वाचे आहे. 11 वी प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय? आणि अर्ज नोंदणी करण्यापासून ते प्रवेशाच्या फेरी आणि निवड प्रक्रिया पर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा.

11th Admission FYJC FAQ 2025 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

11th Admission (FYJC) प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या फेरीचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ सविस्तर खालीलप्रमाणे पाहूया.

प्र.१) इयत्ता ११ वी (FYJC) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली आहे.

प्र.२) कोण अर्ज करू शकतो?

  • इयत्ता १० वी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून (MSBSHSE, CBSE, ICSE, IB, IGCSE, NIOS किंवा इतर राज्य मंडळे) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात.

प्र.३) ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का?

  • होय, ऑफलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत.

प्र.४) नोंदणी कशी करावी?

  • यासाठी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर भेट द्या, Student Registration वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. Login ID तुम्हाला SMS द्वारे मिळेल.

प्र.५) नोंदणी नंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का?

  • होय, आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी Unlock Form पर्याय वापरून किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्या प्रवेश अर्जात सुधारणा करता येते.

प्र.६) मी किती उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंती देऊ शकतो?

  • विद्यार्थी किमान १ व जास्तीत जास्त १० उच्च माध्यमिक विद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवू शकतो.

प्र.७) प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

प्र.८) मी इतर मंडळाचा विद्यार्थी आहे, मी काय करू?

  • आपल्या श्रेणी गुणांचे रुपांतरण गुणांमध्ये करा आणि ते गुण आपल्या अर्जात भरा, आपले इयत्ता १० वीचे हॉलतिकीट व गुणपत्रिका अपलोड करा आणि मार्गदर्शन केंद्रात जाऊन पडताळणी करा. जवळचे केंद्र शोधण्यासाठी पोर्टलवर माहिती पहा.

प्र.९) जर मी इयत्ता १० मध्ये १-२ विषयांमध्ये नापास झालो आहे तर मी इ.११ वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतो का?

  • होय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ATKT (Allowed to Keep Terms) अंतर्गत अर्ज करता येतो.

प्र.१०) कोटा प्रकार कोणते आहेत?

  • इन-हाऊस कोटा (१०%), व्यवस्थापन कोटा (५%), अल्पसंख्याक कोटा (मायनॉरिटी महाविद्यालयांमध्ये ५०% पर्यंत).

प्र.११) कोटा जागांसाठीही ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे का?

  • होय, सर्वप्रकारच्या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे.

प्र.१२) प्रवेशासाठी किती फेऱ्या घेतल्या जातात?

  • चार नियमित फेऱ्या व त्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी (Open to All Round).

प्र.१३) जर मी प्रथम पसंतीचे विद्यालय मिळून देखील प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल?

  • जर विद्यार्थ्यास प्रथम पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले तरीही प्रवेश घेतला नाही, तर संबंधित विद्यार्थी पुढील फेरीसाठी अपात्र ठरेल. इतर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र असतील.

प्र.१४) मी एकापेक्षा अधिक फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतो का?

  • होय, पण प्रत्येक फेरीपूर्वी पोर्टलवर Consent (संमती) देणे आवश्यक आहे.

प्र.१५) नोंदणी फी किती आहे आणि ती कशी भरावी?

  • नोंदणी फी ₹१०० आहे. ती Net Banking, Debit/Credit Card, UPI किंवा डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाईन भरावी लागेल.

प्र.१६) ऑफलाईन पेमेंट चा पर्याय उपलब्ध आहे का?

  • नाही, फक्त ऑनलाईन पेमेंटच स्वीकारले जाते.

प्र.१७) जर मी Login तपशील विसरलो तर?

  • यासाठी Forgot Password पर्याय वापरा किंवा जवळच्या मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करा.

प्र.१८) विद्यार्थ्याला प्रवेश अर्जासंदर्भात अडचणी संदर्भात कुठे मदत मिळेल?

  • शाळा, जवळचे मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन (८५३०९५५५६४) किंवा ईमेल support@mahafyjcadmissions.in यांच्याशी संपर्क करा.

प्र.१९) मी उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकतो का?

  • होय, प्रत्येक फेरीपूर्वी तुम्ही तुमचा Option Form (Part-२) अद्ययावत करू शकता.

प्र.२०) प्रवेश यादीत नाव आल्यावर लगेच प्रवेश निश्चित होतो का?

  • नाही, विहित कालावधीत यासाठी Proceed for Admission वर क्लिक करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर व संबंधित विद्यालयाने प्रवेश निश्चित केल्यावरच आपला प्रवेश निश्चित होतो.

प्र.२१) प्रवेश प्रक्रियेमधून माघार घेण्यासाठी काय येईल?

  • यासाठी पोर्टलवरील Withdrawal पर्याय वापरा यामुळे एक जागा इतर विद्यार्थ्यांसाठी मोकळी होईल.
    प्र.२२) मूळ कागदपत्रांची पडताळणी कोण करेल?
  • जे उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला प्रवेशासाठी मिळाले आहे, तेच उच्च माध्यमिक विद्यालय आपण अपलोड केलेल्या कागदपत्रांशी तुलना करून, इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित मंडळाच्या वेबसाईटवरून/ डिजी लॉकर वरून आपल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेल.

प्र.२३) मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड (Stream) बदलू इच्छितो तर?

  • जर तुम्ही प्रवेश घेतलेला नसेल, तर तुम्ही पुढील फेरीपूर्वी तुमच्या अर्जामध्ये शाखेचा पर्याय व उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकता.

प्र.२४) जर अर्जातील माहिती व मूळ कागदपत्रांतील माहिती वेगळी आढळली तर काय?

  • अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थी नियमित फेऱ्यांमधून अपात्र ठरेल व त्याला फक्त Open to All फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येईल.

प्र.२५) जर विद्यार्थ्याचे इयत्ता १० वीचे गुणपत्रक बनावट/फेरफार केलेले आहे, असे आढळून आल्यास ?

  • अशा विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेण्यापासून प्रतिबंधित केले जाईल आणि गुणपत्रक बनावट ठरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

प्र. २६) शून्य फेरी म्हणजे काय ?

  • शून्य फेरी म्हणजे संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोटा यामधील प्रवेशाचे कामकाज हे काम नियमित फेरी क्रमांक १ सोबत चालणार आहे.

प्र. २७) सर्वांसाठी खुली फेरी (Open to All Round) म्हणजे काय ?

  • नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ज्या फेरीमध्ये विद्यार्थ्याच्या फक्त इ.१० च्या गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार विद्यार्थ्याना उच्च माध्यमिक विद्यालय वाटप करण्याची फेरी होय.

अधिक माहितीसाठी

अधिक तपशीलवार मार्गदर्शक सूचना व माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in संकेतस्थळावर भेट द्या किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधा.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!