11th Online Admission Process 2025-26 शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाराष्ट्रातील सर्व मान्यताप्राप्त 11 वीचे प्रवेश आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. याआधी ही पद्धत फक्त मुंबई (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रात लागू होती. पण आता ती संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आली आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी Maha FYJC Admission in या नावाने mahafyjcadmissions.in ही नवीन अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची A To Z संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Table of Contents
11th Online Admission Process 2025-26 : A To Z संपूर्ण माहिती
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यासाठी इयत्ता ११ वीचे प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली राज्यभरातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लागू करण्यात आली आहे.
11th Admission ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया?
- विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी साठी एकच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
- या अर्जावर आधारित गुणांनुसार वरीष्ठतेच्या (Merit) आधारे प्रवेश दिला जाईल.
- संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, केंद्रीकृत आणि संगणकीकृत असेल.
- प्रवेश फेऱ्या ऑनलाईन यादीच्या माध्यमातून जाहीर केल्या जातील.
महत्त्वाच्या तारखा
- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी सुरू झाली आहे.
- विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम प्रक्रिया २६ मे २०२५ सकाळी ११:०० पासून ते ३ जून २०२५ संध्याकाळी ६:०० पर्यंत सुरू राहील.
प्रवेश प्रक्रियेचे टप्पे
टप्पा १: नोंदणी (Registration)
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी.
- यामध्ये विद्यार्थ्याची माहिती, मोबाईल नंबर, ईमेल, शाळेचे नाव इ. भरावे लागते.
- नोंदणी केल्यावर लॉगिन आयडी व पासवर्ड मिळतो, तो सुरक्षित ठेवावा.
टप्पा २: अर्ज भरून सबमिट करणे
- लॉगिन करून विद्यार्थ्यांनी अर्जात आपली माहिती, गुण (marks), पसंतीच्या कॉलेजेस व कोर्सेस निवडावे लागतात.
- कमीत कमी १ व जास्तीत जास्त १० कॉलेज पसंती नोंदवता येते.
- सर्व माहिती अचूक भरून “सबमिट” करावे.
टप्पा ४: दस्तऐवज (Documents) सत्यापन
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- इयत्ता १० वीचे गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला (LC)
- ओळखपत्र / आधारकार्ड
- जातीचा दाखला (लागल्यास)
- रहिवासी दाखला (डोमिसाईल)
- इतर लागू प्रमाणपत्रे (आरक्षण, अनाथ, दिव्यांग वगैरे)
अकरावी प्रवेश फेर्या (Admission Rounds)
१० वीचा निकाल लागल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
11th Online Admission Process 2025-26 अकरावी प्रवेशासाठी प्राधान्यक्रम निवड करावी लागेल, म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आणि कोणत्या शाखेत (Science, Commerce, Arts) प्रवेश घ्यायचा आहे, याची निवड असते.
प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
शासनाने ११ वी प्रवेशासाठी एक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार चार फेऱ्यांमध्ये प्रवेश दिले जातील.
प्रवेश कशावर आधारित असेल?
- इयत्ता १० वीच्या गुणांवर आधारित.
- राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी: कोणत्याही ५ विषयांतील सर्वाधिक गुण लक्षात घेतले जातील.
- इतर मंडळांसाठी: माहिती व तंत्रज्ञान (IT) किंवा तत्सम विषय वगळून, उर्वरित ५ विषयांतले सर्वाधिक गुण पाहिले जातील.
एकाच गुणसंख्येचे अनेक विद्यार्थी असतील तर काय?
जर दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे समान गुण असतील, तर पुढील पद्धतीने प्राधान्य दिले जाईल:
- ज्येष्ठता: जन्मतारीख ज्याची लवकरची आहे, त्याला प्राधान्य.
- आडनाव: जर गुण आणि जन्मतारीखही सारखे असतील, तर आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगनुसार (A ते Z) प्राधान्य दिले जाईल.
- प्रथम फेरी – अर्ज सादर केल्यानंतर प्रथम यादी लागते.
- द्वितीय व पुढील फेर्या – उर्वरित रिक्त जागांसाठी नवे अर्ज किंवा फेरविचाराने पसंती बदलता येते.
- विशेष फेरी – शेवटी रिक्त राहिलेल्या जागांसाठी विशेष फेर्या घेतल्या जातात.
प्रवेश फेऱ्या कशा असतील?
1. गुणानुसार ४ फेऱ्या:
या फेऱ्यांमध्ये प्रवेश फक्त गुण आणि आरक्षणाच्या आधारे दिले जातील. यामध्ये सामाजिक आरक्षण (SC, ST, OBC इ.) व समांतर आरक्षण लागू असेल.
2. “OPEN FOR ALL” फेरी (सर्वांसाठी खुली):
- पहिल्या ४ फेऱ्यांनंतर उरलेल्या रिक्त जागांसाठी ही विशेष फेरी असेल.
- यामध्ये रिक्त जागांची यादी ऑनलाईन दिसेल.
- विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पुन्हा कॉलेज निवडण्याची संधी दिली जाईल.
- जर रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आले, तर १० वीच्या गुणांनुसार निवड केली जाईल.
फेरी | तपशील |
---|---|
प्रथम फेरी | मुख्य प्रवेश फेरी – प्रथम पसंतीनुसार प्रवेश |
द्वितीय फेरी | उर्वरित जागांसाठी दुसरी संधी |
तृतीय व चतुर्थ फेरी | अजून रिक्त जागांसाठी |
OPEN FOR ALL | सर्वांसाठी खुली फेरी – उर्वरित जागा भरल्या जातील |
11th Online Admission Process 2025-26 संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संगणकीय (ऑनलाईन) पद्धतीने पार पडेल.
महत्त्वाचे आरक्षण कोटे
- अल्पसंख्याक कोटा: ५०%
- व्यवस्थापन कोटा: ५%
- इन-हाऊस कोटा: १०% (खाजगी शाळांसाठी)
- महिला, दिव्यांग, सैनिक पाल्य, खेळाडू यांच्यासाठी समांतर आरक्षण
शुल्क व परतावा नियम
- प्रत्येक अर्जासाठी ₹१०० शुल्क.
- प्रवेश रद्द केल्यास टप्प्यानुसार काही टक्के कपात करून शुल्क परत केले जाईल.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
क्र. | प्रक्रिया | तारीख |
---|---|---|
1 | कॉलेज माहिती अपलोड | 8 ते 15 मे 2025 |
2 | विद्यार्थी नोंदणी व अर्ज | 19 ते 28 मे 2025 |
3 | फेऱ्यांची सुरूवात | जून 2025 पासून |
4 | वर्ग सुरू | 11 ऑगस्ट 2025 पासून |

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महत्वाचे शासन निर्णय
- GR 28.02.2025 – शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत
- GR 08.08.2019 – इयत्ता 11 वी व इ. 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना.
- GR 05.06.2025 – इयत्ता 11 वी व इ. 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना.
अधिकृत वेबसाईट : https://mahafyjcadmissions.in/