दहावीचा निकाल जाहीर, आता गुणांची गुणपडताळणी साठी ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक | 10th Result Marks Verification

Published On: May 8, 2026
Follow Us
10th Result Marks Verification

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीचा निकाल ८ मे रोजी जाहीर केला आहे. आता ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन आणि छायाप्रत

ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट विषयात मिळालेल्या गुणांबाबत शंका आहे, त्यांना आता ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करता येणार आहे. यासाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन (Revaluation) करायचे आहे, त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही छायाप्रत प्राप्त झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. या सर्व प्रक्रियेसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही घरबसल्या हा अर्ज भरता येणार आहे.

गुणसुधारण्यासाठी ‘लगतच्या तीन संधी’

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मंडळाने ‘श्रेणी/गुणसुधार’ (Class Improvement Scheme) योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे.

मार्च २०२६ च्या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होऊनही ज्यांना टक्केवारी वाढवायची आहे, अशा विद्यार्थ्यांना आगामी जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा लगतच्या सलग तीन परीक्षांमध्ये पुन्हा प्रविष्ट होता येईल. या सुविधेमुळे स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले गुण मिळवण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.

पुरवणी परीक्षेचे स्वतंत्र नियोजन

जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी जून-जुलै २०२६ मध्येच पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर केली जाईल.

निकाल लागल्यापासून ते पुढील प्रवेश प्रक्रियेपर्यंत सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

गुणांची गुणपडताळणी साठी ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

10th Result Marks Verification Online Direct Link

अधिक माहितीसाठी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत सूचना पीडीएफ डाउनलोड करा

SSC EXAM RESULT 2026

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment