10th Result 2026 Direct Link Maharashtra Board: 10 वीच्या निकालाची विद्यार्थी, पालक आतुरतेने वाट पाहत आहे. लेटेस्ट अपडेट नुसार निकालाच्या वेळेत बदल करून आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून 8 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता निकाल पाहता येणार आहे.
विभाग/जिल्हा/विषय निहाय निकाल सविस्तर विश्लेषण येथे पाहा
Maharashtra SSC 10th Result Live Updates

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर, आता संपूर्ण राज्याचे लक्ष १० वीच्या निकालाकडे लागले आहे. Latest Updates नुसार आता बोर्डाकडून 10 वीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून, 8 मे 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजता खालील लिंक वर निकाल पाहता येणार आहे.
10th SSC Result Live Link
मागील वर्षी बारावीचा निकाल 5 मे रोजी लागला होता, मात्र यंदा हा निकाल 3 दिवस आधीच म्हणजे 2 मे 2026 रोजी दुपारीच 12 वाजता लागला आहे. त्यानुसार 10 वीचा निकाल मागील वर्षी 13 मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
10th Result 2026 Maharashtra Board – Date & Time Live Updates
12 वीच्या निकाल आणि मागील वर्षाचा अंदाज लक्षात घेता यंदा 10 वीचा निकाल (10th Result Date & Time)8 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जाहीर होणार आहे.
10th Result 2026 Direct Link Maharashtra Board
10 वी निकाल ऑनलाईन कसा व कोठे चेक करायचा?

- सर्वात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) https://mahahsscboard.in/ या किंवा https://results.digilocker.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- त्याठिकाणी होम पेजवर SSC Examination March 2026 Result या लिंक वर क्लिक करा
- आता तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव अचूक टाका आणि view result वर क्लिक करा
- स्क्रीन वर तुम्हाला निकाल दिसेल स्क्रीन शॉट किंवा पीडीएफ सेव्ह करून घ्या.
10th SSC Result 2026 Direct Link
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०८ मे, २०२६ रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.
- https://results.digilocker.gov.in
- https://mahahsscboard.in
- https://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.tv9marathi.com
- https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०९/०५/२०२६ ते शनिवार, दिनांक २३/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.
२) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
३) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.







