Mahajyoti Tab Yojana 2025 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (MAHAJYOTI), महाराष्ट्र राज्य, नागपूर, इतर मागासवर्ग, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाज्योतीमार्फत JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 18 महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार असून, पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि दररोज 6 जीबी इंटरनेट सेवा देखील पुरवली जाणार आहे. यासाठी Mahajyoti Tab Yojana Registration 2025 सुरू झाले आहे. या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया.
Mahajyoti Tab Yojana 2025 संपूर्ण माहिती
Mahajyoti Tab Yojana 2025 लाभाचे स्वरूप: प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असेल. प्रशिक्षणादरम्यान अभ्यासासाठी लागणारा टॅबलेट प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला मोफत दिला जाईल. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आवश्यक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी दररोज ६ जीबी डेटाची सुविधा दिली जाईल.
MAHAJYOTI Tablet योजनेच्या लाभासाठी पात्रता:
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
- सन २०२५ मध्ये इयत्ता १० वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थांना किमान ६० % व शहरी भागातील विद्यार्थांना किमान ७० % गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची निवड १०वीच्या परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीनुसार, सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षणानुसार केली जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (पुढील व मागील बाजू)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
- इयत्ता १०वीची गुणपत्रिका
- इयत्ता ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
आरक्षण:
सामाजिक प्रवर्गानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:

- इतर मागास वर्ग (OBC): ५९%
- विमुक्त जाती – अ (VJ-A): १०%
- भटक्या जमाती – ब (NT-B): ८%
- भटक्या जमाती – क (NT-C): ११%
- भटक्या जमाती – ड (NT-D): ६%
- विशेष मागास प्रवर्ग (SBC): ६%
समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी ३०%, दिव्यांगांसाठी ४% आणि अनाथांसाठी १% जागा आरक्षित आहेत.
Mahajyoti Tab Registration 2025 अर्ज कसा करावा
महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन “Notice Board” मधील “Application for JEE/NEET/MHT-CET- Batch-2025-27 Training” यावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षरी करून स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून जोडावीत. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)
महत्वाच्या अटी व शर्ती:
- Mahajyoti Tab Registration 2025 Last Date : अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे आणि निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्याकडे राहतील.
- कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- अर्ज भरताना काही अडचण आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा: ०७१२-२८७०१२०/२१.
या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करावी, असे आवाहन महाज्योती संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
महत्वाच्या लिंक
- महाज्योती अधिकृत परिपत्रक येथे डाउनलोड करा
- Mahajyoti Tab Registration 2025 डायरेक्ट लिंक
- महाज्योती मोफत टॅब संदर्भात डायरेक्ट लिंक : https://mahajyoti.org.in/application-of-jee-neet-mht-cet-batch-2025-27-training/
- महाज्योती अधिकृत वेबसाईट : https://mahajyoti.org.in/
प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया: या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड एका पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल.
- प्रशिक्षणासाठीची जाहिरात प्रसिद्ध करून ‘महाज्योती’ च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील.
- प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल.
- त्यानंतर उमेदवारांच्या इयत्ता १० वी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- संवर्गनिहाय (Category-wise) आणि समांतर आरक्षणानुसार (Parallel Reservation) पात्र उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी Mahajyoti Tab Yojana 2025 या संधीचा लाभ घेण्यासाठी महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी आणि वेळेत अर्ज सादर करावा. हे प्रशिक्षण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.