MHT CET PCM Notice 2025 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) द्वारे MHT-CET 2025 (PCM ग्रुप) परीक्षेसाठी उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. ही सूचना २१ मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप घ्यायचा आहे, त्यांना आता ऑनलाइन पद्धतीने आपली हरकत नोंदवता येणार आहे.
MHT CET PCM Notice 2025
यावर्षी एमएचटी-सीईटी (PCM) गटाची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. यामध्ये एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,२५,५४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 27 एप्रिल 2025 रोजी एमएचटी-सीईटी (PCM गट) ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक चुका असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या.
दि २७ एप्रिलच्या सकाळच्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांमधून २७,८३७ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. ही फेर परीक्षा ५ मे २०२५ रोजी पुन्हा घेण्यात आली होती. यात फक्त २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सत्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांसाठीच घेण्यात आली. आता या संपूर्ण MHT CET PCM ग्रुपच्या संदर्भात महत्वाची Notice सीईटी सेलकडून जारी करण्यात आली आहे.
हरकती नोंदवण्याचा कालावधी: MHT-CET 2025 (PCM ग्रुप) परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उमेदवारांचा प्रतिसाद (response) आणि योग्य उत्तर की (answer key) प्रदर्शित केली जाईल. यासंदर्भात हरकती नोंदवण्याचा कालावधी २२ मे २०२५ पासून २४ मे २०२५ पर्यंत असेल.
अर्ज प्रक्रिया: उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन हरकती नोंदवाव्या लागतील. तुम्हाला MHT-CET च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या युझर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल. उमेदवारांनी आपल्या लॉगिनमधूनच हरकती सादर करायच्या आहेत. हे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करता येईल.
शुल्क: प्रत्येक प्रश्नासाठी किंवा प्रत्येक आक्षेपासाठी १००० रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क न परत मिळणारे (non-refundable) आहे आणि ते उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमधूनच ऑनलाइन भरावे लागेल.
हरकतींचा मागोवा: उमेदवारांच्या सोयीसाठी, त्यांच्या लॉगिनमध्ये “Objection Tracking” (हरकत मागोवा) या शीर्षकाखाली हरकतींचा मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्याचे आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या स्वाक्षरीने ही सूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना या संदर्भात अधिक माहितीसाठी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : MHT CET PCM Notice 2025 डाउनलोड करा
