महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MAH-MHT CET 2026 PCB Group Second Attempt परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उमेदवारांचे प्रश्नपत्रिका, Candidate Response आणि Answer Key अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, कोणत्याही प्रश्नाबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने हरकत नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.
राज्य CET Cell ने जारी केलेल्या अधिकृत सार्वजनिक सूचनेनुसार, MAH-MHT CET 2026 (PCB Group) Second Attempt साठी Answer Key व Candidate Response 23 मे 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत.
उमेदवारांना जर कोणत्याही प्रश्नाबाबत हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल, तर तो फक्त उमेदवारांच्या Login मधूनच सादर करावा लागणार आहे. प्रत्येक आक्षेपासाठी 1000 इतकी फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
CET Cell ने उमेदवारांसाठी “Objection Tracking” ही सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा उमेदवारांच्या Login Portal मध्ये “Grievances/Objections Tracking” या नावाने उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या आक्षेपाची स्थिती ट्रॅक करता येणार आहे.
महत्त्वाची तारीख
• Answer Key व Candidate Response उपलब्ध कालावधी – 23 मे 2026 ते 25 मे 2026
• आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख – 25 मे 2026
उमेदवारांनी वेळेत Answer Key तपासून आवश्यक असल्यास पुराव्यासह आक्षेप नोंदवावेत. अंतिम मुदतीनंतर कोणतेही आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
| MAH MHT CET 2026 PCB Group Public Notice Download | Click Here |
| CET Cell Official Website | https://cetcell.mahacet.org/ |








