महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल १८ मे २०२६ रोजी www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असल्यास १८ मे ते २७ मे २०२६ या कालावधीत शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचे निकष नेमके काय आहेत? हा प्रश्न असतो. या लेखात आपण (MSCE PUP PSS Scholarship Exam Result Nikash 2026) सविस्तर समजून घेणार आहोत.
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्तीचे प्रकार आणि निकष

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरातून एकूण १६,६९३ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये इतकी रक्कम दिली जाते.
यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण, सर्वसाधारण (मुले व मुली), विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी विशेष विद्यावेतने आणि मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्तर निश्चित केले आहेत.
सर्वसाधारण आणि विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न १,००,००० रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती केवळ महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार घोषित केली जाते.
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्तीचे निकष PDF येथे डाउनलोड करा
पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्तीचे स्वरूप आणि पात्रता

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण १६,५८८ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती संच उपलब्ध आहेत. या परीक्षेतील शिष्यवृत्तीधारकांना दरमहा ७५० रुपये दिले जातात.
पाचवीप्रमाणेच यामध्येही ग्रामीण, शहरी, सर्वसाधारण आणि मागासवर्गीय असे विविध गट आहेत, तसेच ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा खुल्या आणि विशिष्ट गटांसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असण्याची अट आहे. शिष्यवृत्ती संच मर्यादित असल्यामुळे, कटऑफ इतके गुण मिळवणारे सर्वच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरत नाहीत. अशा वेळी (MSCE PUP PSS Scholarship Exam Result Nikash 2026) नुसार योग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्तीचे निकष PDF येथे डाउनलोड करा
समान गुण असल्यास शिष्यवृत्तीधारक निश्चित करण्याचे प्रचलित निकष

परीक्षेत अनेकदा एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कटऑफ इतकेच समान शेकडा गुण मिळतात. संच मर्यादित असल्याने अशा वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने काही प्रचलित निकष वापरून विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरवला जातो. हा प्राधान्यक्रम ठरवताना प्रामुख्याने तीन टप्पे विचारात घेतले जातात.
पहिला निकष म्हणजे जर एकूण गुण समान असतील, तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी (पेपर क्र. २) या विषयात ज्या विद्यार्थ्याला अधिक शेकडा गुण मिळाले आहेत, त्याला प्राधान्य दिले जाते.
दुसरा निकष असा की, जर दोन्ही विद्यार्थ्यांचे पेपर क्रमांक दोन मधील गुणही समान असतील, तर ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त आहे, त्या वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाते.
तिसरा निकष म्हणजे, जर वरील दोन्ही अटींमध्येही समानता आढळली, तर विद्यार्थ्यांच्या पहिल्या नावाच्या आद्याक्षराचा (A TO Z) विचार करून इंग्रजी वर्णमालेनुसार विद्यार्थ्याची निवड निश्चित केली जाते. अशा पारदर्शक पद्धतीने (MSCE PUP PSS Scholarship Exam Result Nikash 2026) अंमलात आणून अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते.
समान गुण असल्यास शिष्यवृत्तीधारक निश्चित करण्याचे प्रचलित निकष PDF येथे डाउनलोड करा
अधिक माहितीसाठी : https://2026.puppssmsce.in/







