मोठी अपडेट! 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल येथे पाहा – डायरेक्ट लिंक

Published On: May 19, 2026
Follow Us
MSCE Scholarship Result 2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE Pune) २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतलेल्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल अखेर जाहीर केला आहे. १८ मे २०२६ रोजी हा (MSCE Scholarship Result) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा सध्यातरी केवळ तात्पुरता निकाल असून, आवश्यक ती पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

मोठी अपडेट! 4 वी आणि 7 वी शिष्यवृत्ती अंतिम Answer key जाहीर – डायरेक्ट लिंक

MSCE Scholarship Result कुठे आणि कसा पाहायचा?

ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यांचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत संकेतस्थळे उपलब्ध करून दिली आहेत. पालक आणि विद्यार्थी www.mscepune.in किंवा https://puppssmsce.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या पाल्याचा निकाल अगदी सहजपणे पाहू शकतात.

निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम https://2026.puppssmsce.in/ या अधिकृत वेबसाईट वर जा आणि तिथे उजव्या बाजूला अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) यावर क्लिक करा.
MSCE Scholarship Result
  • आता तुमचा Seat No टाका.
  • नंतर Mother Name टाका.
  • शेवटी Submit बटणावर क्लिक करा.
  • स्क्रीन वर Result दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह किंवा डाउनलोड करा.

याशिवाय, शाळांना त्यांच्या अधिकृत लॉगीनमधून त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित (MSCE Scholarship Result) पाहण्याची विशेष सुविधा परिषदेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून किंवा थेट शाळेत संपर्क साधून विद्यार्थ्यांचा निकाल तपासून घ्यावा.

महत्वाची अपडेट! 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती निकाल जाहीर, आता गुणपडताळणी व नावातील दुरुस्ती, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती पाहा

अंतरिम निकाल (शाळांसाठी)

  • सर्व प्रथम https://2026.puppssmsce.in/ या अधिकृत वेबसाईट वर जा आणि तिथे डाव्या बाजूला अंतरिम निकाल (शाळांसाठी) यावर क्लिक करा. आता खालील स्टेप नुसार माहिती भरा आणि लॉगिन करून निकाल पाहा.
  • School Login
  • UDISE Code 
  • Password 
  • Login
  • View Result and Download

गुणांची पडताळणी आणि माहितीत दुरुस्ती

बऱ्याचदा निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांबाबत काही शंका असू शकते. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेने गुणपडताळणीची अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची असल्यास १८ मे २०२६ ते २७ मे २०२६ या कालावधीत संबंधित शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज करता येईल.

यासाठी प्रत्येक पेपरला ५० रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. तसेच, विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे किंवा आईचे नाव चुकले असल्यास त्यातही २७ मे पर्यंत शाळेच्या लॉगीनमधून दुरुस्ती करता येणार आहे.

शाळेचे क्षेत्र (शहरी/ग्रामीण) किंवा अभ्यासक्रमात काही बदल करायचे असतील, तर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे सविस्तर पत्र २७ मे पर्यंत puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर पाठवणे गरजेचे आहे.

अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी कधी लागणार?

सध्या जाहीर करण्यात आलेला हा निकाल केवळ अंतरिम म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले सर्व गुणपडताळणीचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्यावर ३० दिवसांच्या आत निर्णय घेतला जाईल. या सर्व पडताळणी प्रक्रियेनंतरच आणि आवश्यक ते बदल केल्यानंतर सुधारित अंतिम निकाल तसेच विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोंधळात न पडता आवश्यक असल्यास मुदतीत अर्ज करावेत.

अधिक माहितीसाठी : शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ च्या अंतरिम निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment